किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मिशन कवच-कुंडल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन

किनवट/प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यामध्ये मिशन कवचकुंडल अंतर्गत विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज सकाळी 07:00 वा. मिनाई दूध डेअरी किनवट व बस स्टँड येथे सकाळी 08:30 वाजता बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्रा .विजय खूपसे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांच्या वतीने लस घेण्यासाठी आवाहन करण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी साहेब डॉ.इटनकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ.मृणाली जाधव मिशन कवच-कुंडल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केल्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे डॉ.संजय मुरमुरे, गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, यांच्या मार्गदर्शनाखाली लस घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे .शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे सर्वांनी लस घ्यावे लस घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते आणि covid 19 हा आजार झाल्यास लवकर बरा होतो असे विनंती तथा आवाहन प्रा. विजय खूपसे ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी गर्दीच्या ठिकाणी जावून करतआहे .याप्रसंगी डॉक्टर अशोक चिंनावार,डॉ. प्रदीप चीनावार, मीनाईन दूध डेरी चे सुनील चव्हाण पाटील, प्रभाकर कराळे,दत्ता बावणे, किरण येरमे ,व्यंकटी गुट्टे, व बसस्टँड येथे कंट्रोलर रमेश शेपूरवार ,कंडक्टर विठ्ठल धनवे, प्रवासी रमेश कोगुरवार ,उईके,सौ. वर्षा सिरमनवार मॅडम,येणारे जाणारे प्रवासी, मीनाई डेअरी दूध विक्री करणाऱ्या ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिक उपस्तीथ होते

509 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.