मतदार संघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी कायम तत्पर.आ.भीमराव केराम
किनवट/ ( किनवट टुडे न्युज) माहूर-किनवट हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोठा आहे. या भागातील नागरिकांस पूरक अशा आरोग्य सोई सुविधा उपलब्ध होत नसल्याची आपल्या मनात खंत होती.त्यामुळे आमदार म्हणून निवडून येताच या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे किनवट येथील उपजिल्हा रूग्णालयाला सिटी स्कॅन मशीन उपलब्ध झाल्याची माहीती आ.भीमराव केराम यांनी दि.10 ऑक्टो.रोजी रेणुकामातेचे दर्शन घेतल्या नंतर पत्रकारांशी चर्चा करतांना दिली.
या भागातील सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय चाचणी करून मिळाली पाहिजे हा हेतू बाळगून जिल्हाधिकारी यांचेसह वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच किनवट येथे 100 बेडचे आयुष केंद्र मिळाल्याची माहीती आ.भीमराव केराम यांनी यावेळी दिली. उपविभागीय अधिकारी यांचे कडून जागा उपलब्ध झाल्याचे प्रमाण पत्र प्राप्त होताच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सांगितले.