महामार्गाच्या दर्जाहीन कामा संदर्भात ना. नितीन गडकरी यांच्या घरासमोर उपोषनास बसण्यासाठी महाआघाडीचे नेते नागपूर कडे रवाना
किनवट(आनंद भालेराव):
हिमायतनगर ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा करण्यात आले असून संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी सदरील काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे ,तसेच किनवट मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग चे काम इस्टिमेट प्रमाणेच रस्ता करण्यात यावे .या मागणीसाठी किनवटचे शिवसेना तालुका संघटक वेंकट भंडारवार, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील अमरदीप कदम,शिवसेना चे प्रशांत कोरडे हे नागपूर येथील केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या घरासमोर उपोषणाला बसण्यासाठी किनवटहुन रवाना झाले आहेत.
(मा.ना.नितीनजी गडकरी यांच्या घरासमोर आघाडीचे नेते )
20 ऑगस्टपर्यंत सदरील काम इस्टीमेट प्रमाणे न झाल्यास 21 ऑगस्ट रोजी माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या घरासमोर उपोषण करणार असल्याचे किनवट येथे पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीच्या या नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ते नागपूरला आज रवाना झाले आहेत पाहूया… पुढील प्रक्रिया काय घडून येईल? याकडे किनवट मधील नागरिकांचे लक्ष लागून आहे.