देवस्थानचं हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे कंधार न्यायालयाचे आदेश
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.5.जिल्ह्यातील संत वट्टेमोड महाराजांच्या संपत्तीवर डोळा ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ही संपत्ती आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 जणांविरुध्द कंधार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.डी.आझादे यांनी कंधार पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मौजे हळदा ता.कंधार येथे नरसींगराव वटेमोड महाराजांनी पंचपिठ सिद्दतिर्थ धाम अशा नावाचे एक संस्थान सन 1988 मध्ये स्थापित केले.हे संस्थान तयार झाल्यावर जगत गुरू शंकराचार्यजी द्वारकापिठ यांना ते संस्थान दान देवून टाकले.
संस्थानच्या मालकीची 81 गुंठे जमीन म्हणजे 2 एकर 1 आर एवढी जमीन आहे.वटेमोड महाराजांच्या समोर हे सर्व कामकाज त्यांच्या देखरेखीत चालत होते. सन 1916 मध्ये नरसींगरावजी वटेमोड महाराजांचे देहावसन झाले.वटेमोड महाराजांचा राज्यात मोठा शिष्यवर्ग आहे. महाराजांच्या निधनानंतर जगदगुरू श्री शंकराचार्यजी द्वारीकापिठ यांना या ठिकाणचा कारभार पाहणे, पुजा अर्चा करणे यासाठी एक व्यक्ती पाठविण्याची विनंती नांदेडच्या स्थानिक लोकांनी केली. तेंव्हा श्री शंकरराचार्यजी यांनी वशिष्ठ शर्मा नावाचा व्यक्ती येथे पाठविला.त्याला सन्यास पंथाची दिक्षा देण्यात आली आणि ते पंचपिठ सिध्दतिर्थ धाम या गादीवर मालक झाले.
सन्यास दिक्षा घेतल्यानंतर वशिष्ठ शर्माचे नाव विशुध्दानंद असे बदलले.त्यांनी कांही स्थानिक लोकांच्यासोबत कटकारस्थान करून नोंदणी कार्यालयात पंचपिठ सिध्दतिर्थधाम सेवा समिती अशी जोडणी करून नवीन विश्वस्त मंडळ बनविण्यासाठी अर्ज दिला. हळदा गावातील वसंत तुळशीराम राठोड यांचे घर नवीन समितीसाठी किरायाने घेतल्याचे दाखविले. पण प्रत्यक्षात ते घर वसंत राठोड यांचे नव्हतेच.
वटेमोड महाराजांचे बंधू भगवान वटेमोड यांनी माहिती अधिकारात बरेच कागदपत्र जमा केले.त्यातून हा सलग्न ट्रस्ट असतांना नवीन होवूच शकत नाही.म्हणून सेवा समिती असे दोन शब्द जोडून नवीन ट्रस्टची मागणी निबंधक कार्यालयाने फेटाळली.त्यानंतर भगवान वटेमोड यांनी पोलीस ठाणे कंधार येथे अर्ज दिला.पण त्यात कांही कार्यवाही झाली नाही म्हणून इतर किरकोळ फौजदारी अर्ज क्रमांक 341/2021 कंधारच्या न्यायालयात दाखल करून दाद मागितली.
कंधार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.डी.आझादे यांनी आपल्यासमोर दाखल झालेले कागदपत्र, युक्तीवाद या आधारावर महंत विशुध्दानंद ब्रम्हचारी उर्फ वशिष्ठ शर्मा,केरबा पुरभाजी वडवळे,डॉ.सुरेश रामराव पवार,नारायण बसण्णा चिंतलवाड,वसंत तुळशीराम राठोड, उमाकांत रामराव पवार, पुरभाजी दिगंबर पुजरवाड, उमाकांत बाबूराव जाधव,गिरधर सारंगधर पाटील,गोविंदराव देवराव वाकोरे आणि विजय गुणाजी मंदावाड या 11 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.या खटल्यात भगवान वटेमोड यांच्यावतीने ऍड.ऋषीकेश संतान यांनी बाजू मांडली.