किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे किनवट तालुका अधिवेशन संपन्न

*शालेय शिक्षण समिती आणि मुख्याध्यापक कामगारांना कमी करण्याचा डाव अखत असतील तर कोर्टात जाऊन गुन्हे दाखल करणार – सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.27.सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेचे पहिले तालुका अधिवेशन किनवट येथील खैरोद्दीन खान सभागृहात दि.२७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले.

अधिवेशनाचे उदघाटन ” चुली कधी पेटल्याच नाहीत ” या ग्रंथाचे लेखक सुभाष बोडेवार यांनी केले. त्या वेळी साहित्यिक बोडेवार म्हणाले की रस्त्यावरची लढाई पूर्वी पेक्षा जोमाने व तीव्रतेने लढून कामगार कर्मचाऱ्यांना आपले अधिकार आणि हक्क प्रदान करणारे कायदे टिकवावे लागतील.

या अधिवेशनासाठी प्रमुख उपस्थित असलेले संघटनेचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी संबोधित केले.
यावेळी कॉ.गायकवाड म्हणाले की,सीटू ही राष्ट्रीय कामगार संघटना असल्यामुळे शालेय पोषण आहार कामगारांचे मोर्चे दिली,मुंबई,नागपूर, पुणे आणि जिल्हास्तरीय संबंधित कार्यालयावर काढण्यात येत असतात त्यामुळे संघटनेने केलेल्या बहुतांश मागण्या ह्या सहज सुटत असतात तसेच शापोआ कामगारांना मानधनात वाढ होत असल्यामुळे गावातील सरपंच,शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी हे आपल्या नात्यातील किंवा जवळचा शापोआ कामगार घेण्यात यावा यासाठी मुख्याध्यापकांवर दबाव निर्माण करीत आहेत.
एका विध्यार्थ्यांमागे पन्नास पैसे मिळत होते तेव्हा पासून म्हणजेच योजना सुरु झाली तेव्हापासून अखंड कामावर असणाऱ्या कामगारांना काढण्यासाठी राजकारण करून डाव अखले जात आहेत.असे ज्याही ठिकाणी डाव अखले जातील तेथील मुख्याध्यापक,सरपंच आणि शालेय शिक्षण समितीच्या सदस्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागून गुन्हे दाखल करण्यात येतील असा स्पष्ट इशारा किनवट येथे दिला.

कायद्याने मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना एकही मुख्याध्यापक मुख्यालयी राहत नाहीत.चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये तसेच जलजीवन मिशन आणि इतर अनेक योजना मध्ये अननियमितता करण्याऱ्या लोक प्रतिनिधीनी स्वतःचे भांडे उताणे करून घेऊ नयेत असे देखील कॉ.गायकवाड म्हणाले.

उपरोक्त अधिवेशनात पुढील तीनवर्षासाठी नवीन तालुका कमिटी निवडण्यात आली असून अध्यक्ष म्हणून कॉ.जनार्धन काळे तर सचिव म्हणून दत्ता शहाणे यांची एकमताने निवड करण्यात आली. या अधिवेशनात उपाध्यक्ष म्हणून सोनाबाई भांगे,कॉ.दिलीप कोडापे,शौकत भाई,विश्वानाथ लोंढे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.तसेच सहसचिव म्हणून गोपाल लष्करे, यमुनाबाई सकवान,यशवंत राठोड,मदिनाबाजी आदींवर जबाबदारी देण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून इंदुबाई डोंगरे तर संघटक म्हणून मारोती वंजारे यांची एकमताने निवड करण्यात आली या अधिवेशनाचा समारोप जोरदार घोषणाबाजी करून झाली आहे.अशी माहिती
कॉ.गंगाधर गायकवाड
सरचिटणीस – महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटना (संलग्न CITU)यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

74 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.