किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कोरोना काळातील वीजबिल माफ करण्याबाबत घुघुस राष्ट्रवादी चे निवेदन

घुघुस/प्रतिनिधी: एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्युत ग्राहकांचे वीज बिल माफ करावे तसेच अतिरिक्त कर आकारणी माफ करावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मागासवर्गीय सेलच्या वतीने उपअभियंता विद्युत वितरण कंपनी यांच्यावतीने नीतीन राऊत विद्युत मंत्री म.रा. यांना पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त इतर राज्यात विज बिल माफ करण्यात आले आहे. तसेच कोरोना मुळे गरिबाचे कंबरडे मोडले आहे. प्रत्येक युनिटमागे वाढलेला दर त्रासदायक होत आहे. आधीच आर्थिक विवंचनेत असलेले गरीब कुटुंब यांना वीज कर्मचाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागात आहे. त्यामुळे ,कोरोना काळातील वीजबिल माफ करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर तालुका अध्यक्ष सत्यनारायण डकरे, तालुका महिला अध्यक्षा सौ सुशीला नारायण डकरे, बुद्ध राज कांबळे, संजय भालेराव ,अभिजीत झाडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

87 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.