राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर आंतरराष्ट्रीय शिक्षा श्रेष्ठता पुरस्काराने सन्मानित
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.7.जिल्यातील धर्माबाद येथील राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय धर्माबाद या शाळेला आंतरराष्ट्रीय शिक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पूरस्कार मान्यवर राज्य शिक्षा मंत्री ए.अरविंद कुमार श्रीलंका यांच्या हस्ते व इंडो फोरमचे चेअरमन किशोर जी रेड्डी श्रीलंका,संनफोचे महासंचालक देशप्रिय विजयतुंगे श्रीलंका व
माइंड मिंगलचे भारत चे संचालक शकील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
शिक्षा शिखर परिषद व उत्कृष्ठता पुरस्कार 2023 या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक सुबोध काकाणी यांच्या वतीने शाळेचे संचालक सुनील श्रीवास्तव यांनी सदर पुरस्कार स्वीकारले.श्रीलंका व भारत येथील विविध शाळेचे शाळा प्रमुख व संचालक मंडळ यांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनाचे उद्देश भारत व श्रीलंका या दोन्ही देशातील खाजगी शाळांतील परस्पर संबंध सदृढ करणे हे होते.
याप्रसंगी शालेय पाठ्यक्रमात ‘शाश्वत’ जागतिक विकास ध्येय कसे समाविष्ट करून या ध्येयाची प्रभावी पणे अंमलबजावणी प्रत्येक शाळा स्तरावर कशी व का करावी.या विषयावर शाळेचे संचालक सुनील श्रीवास्तव यांनी आपले मत मांडले.या पूरस्कार साठी भारत व श्रीलंका येथील शाळेची शिक्षण क्षेत्रात ज्या शाळेचे खुप मोठे योगदान आहे अशा 50 शाळांची तुलनात्मक दृष्टीने निवड करण्यात आली होती.
याबाबद उपस्थित भारत व श्रीलंका मान्यवरांनी सविस्तरपणे विचार मांडले.आर के सहकार विद्या मंदिर या शाळेला आंतरराष्ट्रीय शिक्षा श्रेष्ठता पूरस्कार मिळाल्या बद्दल धर्माबाद,नांदेड, बुलढाणा,सह महाराष्ट्रातील इतर भागातून शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.गत महिन्यातच शाळेची निवड भारतातील 500उत्कृष्ट शाळांमध्ये निवड करण्यात आली हे विशेष.