8 फेब्रुवारी पासून 3 दिवस दूध वितरण बंद.. दुधाचे भाव वाढवून मिळावे यासाठी किनवट दूध उत्पादक संघाने उचलला पावित्रा..
किनवट /प्रतिनिधी: गावरान व म्हशीच्या
दुधाचे भाव वाढवून मिळावे यासाठी किनवट दूध उत्पादक संघाने 8 फेब्रुवारी पासून 3 दिवस दूध वितरण बंद करण्याचा इशारा दिला आहे.
“8 फेब्रुवारी पासून दूध वितरण बंद काळात आंदोलन सध्यापर्यंत किनवट शहरात पिशवी दूध विक्री होऊ देणार नाही. असा इशारा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, ज्ञानेश्वर केंद्रे, प्रशांत कानवटे, हरी बादड यांनी दिला आहे. त्यामुळे तीन दिवस दूध मिळणार नसल्याने दूध खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सर्व ग्राहकांची गैरसोय होणार आहे”.
या काळात पिशवीतील दूध विक्री प्रक्रिया म्हणून पाडण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी सरसावले आहेत असे निवेदन सर्व संबंधितांना दिले आहे. गाय व म्हशीच्या किमती वाढल्या. त्यातच भर म्हणून वैरण, ढेप या किमती खूप वाढले आहेत असे असतानाही शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी हे गाय व म्हशी पालन करीत असून दुधाच्या किमतीत वाढ होणे गरजेचे आहे. गाईचे दूध घरपोच प्रति लिटर 90 रुपये डेरी,हॉटेल चालकास 85 रुपये तसेच म्हशीचे घरपोच 80 रुपये हॉटेल व डेरी चालकास 75 रुपये भाव मिळावा यासाठी दूध वितरण बंद आंदोलन केल्या जात आहे. या काळात प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.