भाजपा माहुर कार्यालयात जनसंपर्क करून जन तक्रार निवारण कैम्प सुरु
किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 27 रोजी आमदार भीमरावजी केराम यानी माहुर येथे दर सोमवारी भाजपा माहुर कार्यालयात जनसंपर्क करून जन तक्रार निवारण कैम्प सुरु केले असून आज प्रामुख्याने विजवितरण कंपनी च्या 200हुन अधिक तक्रारी प्राप्त झाल्या शिवाय प स घरकुल बिले,विहीर योजना बाबत ,पशु वेधकीय सुविधा व कर्मचारी हजर नसल्याबाबत तर तहसील कार्यालयात अपंग, श्रावण बाल ,संजय गांधी निराधार योजना बाबत कर्मचारी उपलब्ध हजर राहून माहिती सांगत नाही ,विविध प्रमाणपत्र वेळेवर मिलत नाही तर आरोग्य विषयक ग्रामीण रुग्णालयात उठसुठ रेफर करण्याचा आजार रुग्णालयास लागला असल्याच्या अनेकांनी तक्रारी दिल्या प्राप्त सर्व तक्रारी बाबत मा आमदार केराम यांना चर्चा करून 1 ते 2 आठवड्यात तालुक्यातिल सर्व कामे मार्गी काढून यापुढे जनतें ची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही सज्ज राहु असे आश्वासन तक्रारदार यांना स्वीय सहायक प्रकाश कुड़मते यानी दिल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे सदर कैम्प साठी माहुर तालुका भाजपा अध्यक्ष दिनेश एउतकर,निलुभाऊ मस्के, आदिवासी आघाडीचे संजय पेंडोर,नगरसेवक गोपू महामुने उपस्थित होते