किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

अत्याधुनिक सेवा सुविधांच्या उपलब्धीसह लोकाभिमूख गतीमान प्रशासनावर भर- पालकमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*नांदेड*:दि.20. जिल्यात प्रशासकीय सोईच्या दृष्टीने अनेक नानाविध तंत्रज्ञानावर आधारित माध्यमे विकसीत झाली आहेत.या माध्यमांचा जिल्ह्यातील प्रशासनाला लोकाभिमूखतेची जोड देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत यावर आम्ही भर दिला आहे.

जिल्ह्याच्या विकासाला लोकप्रतिनिधींच्या सहमतीतून ज्या सभागृहात नियोजनाचा आराखडा तयार केला जातो त्या सभागृहालाही आता अत्याधुनिक माध्यम व तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या वैभवाला नवी जोड मिळाल्याचे गोर्वरोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काढले.
 
आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्ह्यातील 5 नगरपरिषदांना सुसज्ज अग्निशमन दल वाहनाचे हस्तांतरण, डॉ.शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथील मुख्य सभागृहात उभारण्यात आलेल्या नवीन भव्य डिजिटल एलईडी डिस्पलेचे अनावरण,ग्रीन जिमचे उद्घाटन,श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे आरोग्य विभागाच्या 10 रुग्णवाहिकेचे लोकार्पण,जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅटमेंटन कोर्टचे उद्घाटन,नांदेड वाघाळा शहर मनपाच्या स्टेडिअम परिसरातील बॅटमेंटन कोर्टचे उद्घाटन आणि क्लब रोडच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण आज पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर,महापौर जयश्री पावडे,आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर,माजी राज्यमंत्री डी. पी.सावंत,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे,मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असून प्रशासकीय सेवा सुधारण्यासमवेत आरोग्याच्या सेवा-सुविधा पर्यंत याचबरोबर चांगले निकोप आरोग्य प्रत्येकाला लाभावे,युवकांना विविध खेळांच्या सरावासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर मी अधिक भर दिला असल्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील बॅडमिंटन व टेनिस कोर्टचे हे सर्व सुविधायुक्त दोन हॉल राष्ट्रीय पातळीवरील नवीन खेळांडू घडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
नांदेड जिल्ह्याचे पॅरानॅशनल चॅम्पियम बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नाव उज्ज्वल करणाऱ्या लता उमरेकर हिचा यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सत्कार केला. उत्तराखंड येथे सन 2019 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत लता उमरेकर हिने सिलव्हर मेडल प्राप्त केले आहे. यावेळी महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विरेंदरसिंघ गाडिवाले,महिला व बालकल्याण शिक्षण सभापती संगिता पाटील-डक,नगरसेवक मुन्तजिबोद्दीन,दुष्यंत सोनाळे,नागनाथ गड्डम,विजय येवनकर,इजी. हर्जिंदर सिंघ संधू,आदी मान्यवर उपस्थित होते.
 
*नांदेड जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थाना या नवीन 10 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या*.

यात उपजिल्हा रुग्णालय मुखेड,देगलूर,गोकुंदा,ग्रामीण रुग्णालय बारड,अर्धापूर,भोकर, नायगाव, माहूर तर किनवट तालुक्यातील सारखणी व बोधडी येथील आश्रम शाळा यांचा समावेश आहे.
 
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड-19 च्या रुग्णांसह जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमामध्ये रेफरल ट्रान्सपोर्ट कार्यालयामार्फत माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता आणि आजारी बालकांना मोफत वाहन संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे,गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी तपासणीसाठी वाहन पुरविणे,संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कमीत कमी वेळात सर्व केंद्राना लसीकरणाचा साठा पोहचविणे नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील,दुर्गम व पहाडी परिसरात तसेच जंगल परिसरात रुग्णांना विविध रुग्ण सर्वेक्षण करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून या शासकीय रुग्णवाहिका उपयोगात आणल्या जाणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
 
जिल्ह्यातील 5 नगरपरिषदांना नवीन अग्निशमन दलाची वाहनांची चाबी मा.पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी संबंधित नगरपरिषदांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या.या नगरपरिषदांमध्ये मुदखेड, धर्माबाद,बिलोली,कुंडलवाडी, अर्धापूर यांचा समावेश आहे.
 
*पालकमंत्री चव्हाण यांनी दत्तक धनेगाव व मालेगावला सौर विद्युत संच देऊन “मिशन आपुलकी”च्या पोर्टलचे केले उद्घाटन*
 
लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या *मिशन आपुलकी* च्या पोर्टल व वेबसाईटचे उद्घाटन पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांनी कर्तव्यपूर्तीतून केले.केलेल्या विकास कामांची निगा व त्याचा पुरेपुर सदउपयोग जर घ्यायचा असेल तर त्यात प्रत्येक योजना या ग्रामस्थांना त्याच्या वाटल्या पाहिजेत.कोणत्याही योजनेतील लोकसहभाग हा म्हणूनच अधिक महत्वाचा असतो.विकास प्रक्रियेच्या मूळ विचाराला चालना देण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम 15 ऑगस्टपासून जिल्हाभर हाती घेतला आहे.*जिल्ह्याच्या विकास कामांची वेगळी ओळख* या उपक्रमामार्फत होत असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही नांदेड जिल्ह्यातील धनेगाव व मालेगाव या दोन गावासाठी आपलेही योगदान देण्याचे निश्चित केले आहे.या दृष्टिकोनातून त्यांनी या योजनेच्या वेबपोर्टलचे प्रत्यक्ष एका छोट्याशा कृतीतून शुभारंभ केला.
 
विशेष म्हणजे हा उपक्रम डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनामध्ये बसविण्यात आलेल्या भव्य डिजिटल एलईडी प्रकल्पाच्या स्क्रिनवर प्रात्याक्षिकासह केला गेला.या वेबपोर्टलवर आता योगदान कर्त्याचे नाव व त्यांनी आपल्या गावासाठी देऊ केलेल्या योगदानाची नोंदणी यावर करता येईल.एका ॲपच्या सहाय्याने प्रत्येक गाव यात जोडले गेले असून योगदान कर्त्यांनी नोंदणी व इतर प्रक्रिया करताच तात्काळ ऋणपत्र (प्रमाणपत्र) पाठवण्याची सुविधा अंर्तभूत केली आहे. आयटी सोलूशन्स कंपनीमध्ये कार्यरत किनवट सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सदर ॲपचे काम केले आहे.सेटट्राइब ही संस्था आदिवासी भागातील मुलांच्या ई-साक्षरतेसाठी योगदान देत असून यापुढेही आवश्यक ती मदत करू असे संचालक सारंग वाकोडीकर यांनी सांगताच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौतूक करुन शासनातर्फेही आम्ही प्रयत्न करु असे सांगितले.

46 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.