साधी राहणी,उच्च विचार श्रेणी असलेल्या श्रीमती सुर्यकांता ताई पाटील यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने परंतु मोठ्या उत्साहात साजरा
किनवट(आनंद भालेराव):
माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री श्रीमती सुर्यकांता ताई पाटील यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने परंतु मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या माजी खासदार व माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री भारत सरकार यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघात विकासाची गंगा आणली होती. यांच्या काळात झालेला विकास आजही लोकांच्या मनामनात घर करून आहे. किनवट माहूर मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांना मानसपुत्र मानून या मतदारसंघात कोटयवधी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकासासाठी प्राप्त करून दिला होता. हुतात्मा जयवंतराव पाटील यांची कन्या श्रीमती सुर्यकांता ताई पाटील या एका शेतकरी कुटुंबात जन्मल्या
अगदी सुरुवातीच्या काळापासून आपर्यंत राजकारणाच्या व समाजकारणाच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षांपासून जनतेची सेवा करीत आहेत. अगदी साधी राहणी,उच्च विचार श्रेणी असलेल्या ,सामान्य जनतेचे काम हेच ध्येय उराशी बाळगून आज पर्यंत राजकारणात वावरत आहेत.
जीवनात कधीही पैशाचं राजकारण केले नाही. त्यांनी कार्यकर्ते व नाते जपले.आज भारतभर त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
आज अशा नेत्यांची कार्यकर्त्यांना गरज आहे आहे परंतु सध्या पैसा सर्वात मोठा बनू लागला आहे . तसेच राजकारणात हुजुरी गिरी करणाऱ्यांची फौज निर्माण झाली आहे. त्यामुळे सच्चे कार्यकर्ते मागे पडत आहेत.
ताई चा आज वाढदिवस! त्यांना किनवट माहूर विधानसभा मतदार संघातील जनतेतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!