किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने लातूरचे नूतन एस पी सुमय मुंडे यांच्याशी साधला सुसंवाद

*स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय गजानन भातलवंडे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार*

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्हा शाखेच्या वतीने लातूरचे नूतन पोलीस अधीक्षक श्री सुमय मुंडे यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संघटनेचे वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, पत्रकार नितीन चाळक, राम रोडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करणे, पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय साधणे, सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार आणि पोलीस यांचे सहकार्य असणे, पत्रकारावर होणारे खोटे गुन्हे यावर निर्बंध घालणे, लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकार आणि पोलिसांनी एकत्र येऊन काम करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच गुन्हेगारीवर आळा घालणे, महिलांना सुरक्षा देणे, तरुण पिढीला व्यसनमुक्त करून एम पी एस सी व यू पी एस सी या स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे पोलीस अधीक्षक श्री सुमय मुंडे यांनी सांगितले व दीपावली निमित्त सर्व लातूर जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

65 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.