लसाकम संघटनेच्या विदर्भ दौऱ्याची जिवती येथे समारोपीय बैठक
जिवती :-व्यवस्थापरिवर्तन हे ब्रीदवाक्य घेऊन आणि शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांचे विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या लहुजी साळवे कर्मचारी महासंघ या संघटनेचे पदाधिकारी श्री नरसिंग घोडके- राज्यनिमंत्रक,श्री प्रा डॉ सोमनाथ कदम -कार्याध्यक्ष, श्री राजकुमार नामवाड -महासचिव यांनी विदर्भाचा दौरा केला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये भेटी दिल्यानंतर दौऱ्याची सांगता चंद्रपूर जिल्यातील जिवती येथील समारोपीय बैठकीने झाली.बैठकीचे आयोजन डॉ अंकुश गोतावळे यांनी केले होते.
बैठकीदरम्यान लसाकम च्या राज्यपदाधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचारी बांधवाना मार्गदर्शन केले.श्री नरसिंग घोडके यांनी सांगितले की, बहुजन समाजाच्या उत्थानासाठी कर्मचारी यांची चळवळीतील भूमिका अतिशय महत्वाची असून त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या उत्पनाचा 20 वा भाग समाजींक चळवळीला देण्याचे जे डॉ बाबासाहेबानी सांगितले आहे त्याचे पालन केले पाहिजे. आणि लोकांना जागृत करून संविधानिक हक्क मिळवण्यासाठी झटले पाहिजे कारण संविधान हेच विकासाचे माध्यम आहे असे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थितानी चळवळीबाबत अनेक प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरे मान्यवराणी दिली. बैठकीस प्रा. सुग्रीव गोतावळे, प्रा. नरसिंग लिंबोरे, श्री राजाराम घोडके सर, श्री रामकिसन गायकवाड सर,श्री पंडित पवार सर,श्री दत्ता दोरे सर, श्री दीपक गोतावळे सर, श्री भगवान डुकरे सर,श्री दता तोगरे, श्री भानुदास जाधव, डॉ पांडुरंग भालेराव ,श्री संतोष गोतावळे, श्री मिथुन गोतावळे, श्री रितेश नामवाड, श्री रमेश भोगे आणि इतरही मान्यवर उपस्थित होते.