लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित.. सामाजिक न्याय संविधान प्रतिज्ञा परिषद हदगाव येथे संपन्न
हदगाव: लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित.. सामाजिक न्याय संविधान प्रतिज्ञा परिषद हदगाव येथे खंबीर नेतृत्व तथा मार्गदर्शक संघर्ष नायक प्रा रामचंद्रजी भरांडे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.यामध्ये सामाजिक न्याय व संविधान आपला आत्मा आहे.या विषयी तसेच आगामी वर्धापन दिनानिमित्त ३१ जानेवारी २०२५रोजी प्रबोधन महासभा मुंबई घेण्यात येणार आहे.त्याची तयारी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज बांधवांनी करावी असे आवाहन करण्यात आले.
तर अनमोल असे मार्गदर्शन रावसाहेबदादा पवार,व्हि.जी. डोईवाड,नागोराव नामेवार,शेषराव रोडे,गणपतराव रेड्डी, श्रीमती गोदावरीबाई गायकवाड यांनी केले. प्रस्तावना धोंडोपंत बनसोडे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर तर सुरेख सुत्र संचालन अरुण गायकवाड वाळकीकर यांनी केले. परिषदेचे आयोजन व परिश्रम संजय खानजोडे हदगाव बाबुराव दोडके, दयानंद गायकवाड कोळीकर तालुकाध्यक्ष अनिल काळे,राजु सुर्यवंशी, रोहित शिरसाट, तेजस गजभारे आदी घेतले आहे. या परिषदेस मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थित लाभली होती*