किनवट येथे भारतीय माजी सैनिक महाराष्ट्र राज्य संघटना, किनवट / माहूर स्थापन
किनवट तालुका प्रतिनिधी : भारतीय सैन्य दलाची ड्युटी बजावत सेवानिवृत्त झालेल्या भारतीय सैनिकांनी उर्वरीत समोरील जीवनही सतर्कतेमध्ये जाण्यासाठी किनवट येथे भारतीय माजी सैनिक महाराष्ट्र राज्य संघटना, किनवट / माहूर स्थापन करून सैनिकासह सपत्नीक एकत्र येत सैनिकांच्या पत्नी ( महिलांनी ) दिनांक 30 डिसेंबर रोजी गोकुंदा येथील माजी सैनिक कॅप्टन आनंद जाधव सर यांचे निवासस्थानी महिला बचत गट व माजी सैनिकांची संघटना मीटिंग घेण्यात आली यावेळी सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक यांची उपस्थिती होती .
सविस्तर वृत्त असे की भारतीय सैन्य दलाबले परिवारांपासून भारत मातेच्या संरक्षणासाठी ड्युटी बजावत सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक यांनी एकत्र येऊन उरलेले समोरील जीवन हे आनंदात व सर्व सैनिक एकत्रित येत परिवारांचा एकमेकांशी परिचय होत आनंदी जीवन जगण्यासाठी किनवट माहूर तालुक्यामध्ये भारतीय माजी सैनिक महाराष्ट्र राज्य संघटना स्थापन करण्याचा विचार करत अध्यक्ष आनंद जाधव यांचे अध्यक्षतेखाली कॅप्टन जाधव यांचे निवासस्थानी गोकुंदा येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी सर्व माजी सैनिक व त्यांच्या परिवारासह मीटिंगची आयोजन करण्यात आले होते .
भारतीय माजी सैनिक महाराष्ट्र राज्य संघटना किनवट माहूर पियाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष सचिव व सदस्य निवडीसाठी अध्यक्ष आनंद जाधव व सर्वानुमते या संघटनेच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन उल्हास राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव मेजर साहेबराव चव्हाण, उपाध्यक्ष मेजर अशोक सिडाम, कोषाध्यक्ष मेजर भिमराव पडलवार तर नांदेड सचिव पदि मेजर बळीराम कुडमेते यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली .
भारतीय माजी सैनिक महाराष्ट्र राज्य संघटना कार्यकारणी निवड झाल्यानंतर भारतीय सैन्य दलामध्ये एकत्रितपणे ड्युटी बजावत आनंदाचे दिवस काढून घरी परतल्यानंतर आपल्या भारतीय सैन्य दलातील परिवारांनी एकत्रित राहण्यासाठी महिला बचत गट काढण्याचे आयोजन केले असून महिला बचत गटाचे अध्यक्ष वर्षाताई आनंद जाधव,उपाध्यक्ष विजयमाला अशोक सिडाम, तर सचिव पदी अरुणाताई साहेबराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी सैनिक यांच्या पत्नींचा महिला बचत गट दिनांक 30 डिसेंबर रोजी झालेल्या मीटिंगमध्ये महिला बचत गट सुरू करण्यात आला आहे .यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डी .जे काळे,होते तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मेजर साहेबराव चव्हाण यांनी केले .कार्यक्रमाला उपस्थित माजी सैनिक आनंद जाधव, तुकाराम मासिदवार, शे मुस्ताक,बळीराम कुडुमते,राजाराम बापूलवार,भीमराव पडलवार,अरविंद भवरे,लक्ष्मण हिंगोले,नामदेव जाधव,प्रमोद पोहरकर,रत्नाकर मैंद,साहेबराव चव्हाण .,उल्हास राठोड,भगवान मोरे,अशोक सिडाम व विजय मिरासे असे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा केलेले माजी सैनिकांची यावेळी उपस्थिती होती .