किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेडमध्ये पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल इच्छुकांकडून 50 अर्जांची कक्षातून उचल

नांदेड दि.२८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे नाव जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण आहे, अशी माहिती १६- नांदेड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे.२८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीतील अंतीम एकूण उमेदवार हे आठ तारखेच्या रात्री निश्चित होईल.

५० अर्जाची इच्छूकांकडून उचल
नांदेड लोकसभेची निवडणूक २६ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या सूचकाला नामनिर्देशनपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील उमेदवार सहाय्य कक्षात मोफत उपलब्ध आहेत. आज पहिल्या दिवशी 50 कोरे फॉर्म उमेदवार सहाय्यता कक्षातून इच्छूकांनी घेतले आहे.

शनिवारी अर्ज घेता येईल
गुरुवार ४ एप्रिलपर्यत (सार्वजनिक सुट्टी व्यक्तीरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून इच्छूकांना कोरे अर्ज प्राप्त करता येतील.उद्या गुड फ्रायडे असल्यामुळे शुक्रवारला सुट्टी आहे. मात्र शनिवारी कार्यालय सुरू राहणार आहे. ११ ते ३ या कालावधीत अर्ज प्राप्त करणे अर्ज सादर करणे ही प्रक्रिया करता येणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

५ एप्रिलला छाननी
नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवार ८ एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यत देता येईल.

प्रवेशासाठी ओळखपत्र अनिवार्य
उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिनांकापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांपासून तर उमेदवारी अर्ज दाखल करणे व अर्ज प्राप्त करण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना ओळख ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापुढेच सहाय्यता कक्ष असल्यामुळे सकाळी ११ ते ३ या काळात अत्यावश्यक काम असल्याशिवाय या परिसरात प्रवेश बंदी आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ९.४५ वाजताच कार्यालयात स्थानापन्न होण्याची ताकीद निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे
00000

246 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.