*६ जानेवारी ला श्री गुरु गोबिंद सिंघ जी जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करा… दिपकसिंघ हुजेरिया*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि. ३०.जिल्यातील मा खा.अशोकराव जी चव्हाण साहेब,मा.खासदार अजित गोपछेडेजी,मा खासदार रविंद्र चव्हाणजी,व सर्व आमदार साहेब,व सर्व नांदेड जिल्ह्यातील विकास प्रेमी, क्रीडा प्रेमी,पर्यटन प्रेमी,तसेच सर्व राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते गुरूद्वारा बोर्ड प्रशासन यांना दिपकसिंग हुजेरिया यांनी एका निवेदनातुन जाहीर विनंती करण्यात आली आहे.
श्री गुरु गोबिंदसिंघ जी महाराज जी च्यां जयंती साठी विशेष बाब म्हणून स्थानिक सुट्टी नियमितपणे दर वर्षी जाहीर करवून घ्यावी या साठी सर्वांनी मिळुन प्रयत्न करावे असेही त्यांनी नमूद केले आहे.
नांदेड शहर हे फक्त व फक्त गुरु गोबिंदसिंघजी च्या पावन ऐतिहासिक स्थळा मुळे जगप्रसिद्ध आहे.
यामुळे लाखो भाविकदेश विदेशातून येत असल्याने येथील स्थानिक लोकांना पर्यटकांमुळे चांगला रोजगार मिळतो
दर वर्षी गुरुगोबिंद सिंघ जी जयंती निमित्त राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण व सिल्व्हर हॉकी स्पर्धा घेतल्या जात असल्याने खेडाळुवृती निर्माण होण्यास मदत मिळते व राष्ट्रीय पातळीवरील खेडाळु तयार होण्यासाठी प्रोत्साहन मिळते
दर वर्षी गुरु गोबिंद सिंघ जी जयंती मुळे हजारो यात्रेकरू येत असल्याने स्थानिक ॲटो चालक,चार चाकी वाहने,व व्यापारी बांधवांना ह्यांचा चांगला फायदा होऊन रोजगार मिळतो
देश विदेशातील पर्यटक येत असल्याने पर्यटन व्यवसाय क्षेत्रात वृध्दी होण्यासाठी मदत मिळते.
म्हणून आपण सर्वांनी या बाबतीत एकजुटीने प्रयत्न करून गुरु गोबिंद सिंघ जी जयंती निमित्त स्थानिक सार्वजनिक सुट्टी दर वर्षी जाहीर होईल या बाबतीत इमानदारी प्रयत्न करून सुट्टी मिळवून द्यावी येणाऱ्या सहा जानेवारी ला श्री गुरु गोबिंद सिंघ जी जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी विनंती केली आहे.