हिमायतनगर शहरात दिवसाढवळ्या महाविद्यायीन विद्यार्थ्याचा खुन.
प्रतीनिधी /राजु गायकवाड.
हिमायतनगर महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा दिवसाढवळ्या खुन झाला हि घटना शहरातील बसस्थानक परीसरात दि. ११ शनिवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
यश उत्तम मिराशे (वय १७ वर्ष) रा. कारला पी . असे खुन झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर खुन करनाऱ्या आरोपीचे नाव अनुज सुशांत पवनेकर (वय १७ वर्ष) आहे.
दि. ११ शनिवारी बसस्थानक परीसरात सेवा निवृत्त सैनिक कैलास सावते यांच्या गौरव सोहळ्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे परीसरातील लहान थोर कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. त्यामुळे परीसरातील वर्दळ कमी होती, कमी वर्दळीचा फायदा घेत.याच दरम्यान अंदाजे एक वाजता तरूणाने तरूणाचा परीसरात खुन केल्याची एकच खळबळ उडाली, यावेळी तेथिल काहींनी पोलिसांना घटना घडताच फोन केला परंतु पोलिस घटना घडल्या नंतर अर्धा तास उशीराने पोहचले, याच घटनेत सोहम चायल नामक तरूण जख्मी झाला आहे.
एकुनच वारंगटाकळी येथिल कत्तीने वार करून झालेला खुनाचा प्रयत्न, सोनारी येथिल विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना, आज घडलेली खुनाची घटना पोलिसांचा वचक कमी झाल्याची जनतेतुन चर्चा होत असुन नुसते सणा सुदिच्या काळात पथसंचलन न करता पोलिसांनी वचक वाढवुन दबदबा निर्माण करने गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेचा या घटनेमुळे ग्रामिण भागातुन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या पालकांतुन चिंता व्यकित केली जात असुन भितीचे वातावरण आहे.दरम्यान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जख्मींची विचारपूस केली व मयताच्या नातेवाइकांना धीर दिला, खासदार हेमंत पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या प्रकरनात कुणाचीही गय करू नका असे आदेशित केले.