इसापूर धारण पाणी साठा वाढला; पैनगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना
किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, सरपंच उपसरपंच ग्राम पातळीवरील ग्राम आपत्ती समितीतील सर्व सदस्य यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की आज 12 सप्टेंबर 2021 रोजी पर्यंत इसापूर धरणामध्ये 97.92 एवढा पाण्याचा साठा आहे त्यामुळे सदरील साठा 98.50 पर्यंत गेल्यास ईसापुर धरण यामधून पाणी सोडण्यात येईल असे अभियंता ईसापुर धरण पैनगंगा प्रकल्प यांनी कळविले आहे त्यामुळे वरील प्रमाणे सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टी किंवा मोठा पाऊस झाल्यास निश्चितच ईसापुर धरणांमधील पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे नदीकाठचे सर्व गावातील नागरिकांना वेळीच सतर्क करणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या स्तरावर निर्गमित होणाऱ्या सूचना संदेश हे नदीकाठच्या गावातील नागरिकापर्यंत पोहोचतील या बेताने कार्यवाही करावी. तसेच तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी हे मा.सहाय्यक जिल्हाधिकारी महोदय किनवट तसेच तहसीलदार तथा तालुका आपत्ती प्राधिकरण अधिकारी किनवट यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही याची नोंद घ्यावी.