किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

स्व.संगीतादेवी उच्च माध्यमिक आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालयात ३०० वृक्ष लागवड व टॅब चे वितरण.

सारखणी – दि, १२ :- स्व.संगीतादेवी उच्च माध्यमिक आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालय दहेली तांडा ता किनवट येथे मियावाकी धनवन योजना अंतर्गत३०० झाडांची लागवड व इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत प्राप्त झालेल्या सॅमसंग टॅब चे विध्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

व तसेच आश्रम शाळेतील गोरगरीब विध्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी मधील शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण घेत यावे म्हणून महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत व सहाय्यक आयुक्त तेजस माळवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कनिष्ठ महाविद्यालयाला ३०० सॅमसंग टॅब प्राप्त झाले होते. या टॅब चे वाटप गटशिक्षणाधिकारी अनिल महामूने शिक्षण विस्तार अधिकारी आर आर जाधव,केंद्रीय मुख्याध्यापक सुर्यवनशी बेनवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी अरुण राठोड,रोहिदास चव्हाण पालक,व शिक्षक ,कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्षा सौ.लताताई चव्हाण,सचिव डॉ विकास जाधव यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य पी आर आडे यांनी केले तर सूत्र संचालन इंदूर आभार बी एम मुडे यांनी मानले.

382 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.