हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कनकीचा कबड्डीसंघ तालुका स्तरीय 17 वयोगटातील अंतिम सामना जिंकल्याने जिल्हास्तरीय खेळासाठी प्रवेश
किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुका क्रिडा स्पर्धेत हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कनकी टीमने तालुका स्तरीय 17 वयोगटातील कबड्डी सामना जिंकून जिल्हास्तरीय खेळासाठी प्रवेश पात्र ठरला आहे.
आज 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा किनवट येथील तालुका क्रीडा संकुल येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैजनाथ करपुडे पाटील, भाजप नेते बाबुराव केंद्रे, भाजपाचे जिल्हा नियोजन समिती नांदेड चे सदस्य बाळकृष्ण कदम, तालुका क्रीडा संयोजक संदीप यसीमोड, पंढरीनाथ दादा,नरसिंग सर,उत्तम कानिंदे सर,आनंद भालेराव, नायब तहसीलदार साहेब,माजी नगरसेवक जाहिरोद्दीन खान,सतीश राऊत सर आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले की, क्रीडा संकुल साठी 5 कोटीचा निधी उपलब्ध असून भविष्यात सदरील क्रीडा संकुल अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात दिसेल या खेळाच्या क्षेत्रातून अनेक खेळाडू राज्यस्तरीय विभागीय व नॅशनल स्तरावर पोहोचतील. सामन्याचे उद्घाटन माननीय आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व सामने शिस्तीमध्ये खेळविण्यात आले. त्यामुळे सर्व स्पर्धा अगदी शांततेत पार पडली.
17 वर्षे वयोगटातील कबड्डी स्पर्धेत अंतिम सामना श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय देहली व हुतात्मा जयवंतराव पाटील कनकी यांच्यामध्ये अगदी अटीतटीचा झाला विशेषतः सदरील दोन्हीही शाळा मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था हिमायतनगर द्वारा संचलित आहेत. या अटीतटीच्या सामन्यात हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी यांनी अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सूर्यकांताताई पाटील, सचिव अरुण कुळकर्णी, संचालक श्री सूर्यकांत रेड्डी कल्यामवार, श्री प्रशांत रेड्डी कल्यामवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे, हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन तालुका क्रीडा संयोजक श्री संदीप यसीमोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या यशाबद्दल तालुकास्तरातून या विद्यार्थ्यांनवर अभिनंदनाचा वर्ष होत आहे.