देशातील नागरीकांमध्ये बॅंकींग सेवां संदर्भात जागृती या करिता राष्ट्रव्यापी गहन जागरुकता अभियान; किनवट येथिल कॅनरा बॅक शाखेची निवड
किनवट ता. प्र दि २४ देशातील नागरीकांमध्ये बॅंकींग सेवां संदर्भात जागृती या करिता राष्ट्रव्यापी गहन जागरुकता अभियान, राष्ट्रव्यापी आर्थिक जागरुकता अभियान रिझर्व बॅक ऑफ इंडियाव्दारे राबविण्यात येत आहे. या अणुषंगाने किनवट येथिल कॅनरा बॅक शाखेची निवड हि नागरीकांना लोकजाहीराती व विविध प्रकारचे बॅनर, ध्वनीप्रक्षेपकांचा वापर करुन बॅकींग सेवा संदर्भात जागरुकता निर्माण करण्याकरिता करण्यात आली होती. या संदर्भात कॅनरा बॅक शाखा किनवट् च्या अधिकारी व कर्मचा-यांनी कठोर परिश्रम घेत किनवट शहरात विविध जाहिरातीच्या माध्यमांचा वापर करुन नागरीकांमध्ये रिझर्व बॅक ऑफ इंडियाच्या सुचने प्रमाणे जागॄती निर्माण करण्याकरिता प्रयत्न केले.
या दरम्यान नागरीकांना आपले ए.टी.एम कार्ड कसे सुरक्षित वापरावे, मोबाईल बॅकींग, इंटरनेट बॅकींग चा सुरक्षित वापर कशा प्रकारे करावा, आजच्या काळात सर्वाधिक वापरात असलेले युपीआय पेंमेंट करतांना कशी सुरक्षितता बाळगावी व या दरम्यान निर्माण होणारे फ्रॉड किंवा धोके कसे टाळावे या करिता कॅनरा बॅक़ शाखा किनवट तर्फे ध्वनीप्रक्षेपकाव्दारे, पॉम्प्लेट्व्दारे, नागरीकांच्या विविध प्रतिष्ठाणला भेट देऊन जागॄती अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
तर बॅकिंग सेवा संदर्भात तक्रार निवार्णार्थ रिझर्व बॅकेंकडुन करण्यात आलेल्या यंत्रणेची माहिती हि नागरीकांना पुरवण्यात आली. यामध्ये बॅक शाखे पासुन ते लोकपाल पर्यंत कशा प्रकारे ग्राहक आपली तक्रार नोंदवु शकतात या विषयी माहिती नागरीकांना पुरवण्यात आली. कोणत्या तक्रारीला किती दिवसाची मर्यादा आहे. जसे ३0 दिवसात तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ग्राहक आपली तक्रार लोकपाल कडे नोंदवु शकतो या व अशा विविध उपाययोजना संदर्भात माहीती बॅकेचे शाखधिकारी नितिन वाघमारे यांनी किनवट शहरातील नागरीकांना व बॅक ग्राहकांना पुरवली. तर यावेळी शहरात ठीकठीकाणी पॉप्लेट वाटण्यात आले तर ध्वनीप्रक्षेपकाचा वापर देखिल करण्यात आले. या करिता शाखाधिकारी नितिन वाघमारे यांच्यासह बॅकेचे कर्मचारी आशिष तायडे, श्वेता किनाके, कल्पना मेश्राम, कल्याण तिरमनवार यांनी कठोर परिश्रम घेतले.