15,000/- लाचेची पंचासमक्ष मागणी करून तडजोडीअंती रु. 5,000/- घेण्याचे मान्य केल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड:
15,000/- लाचेची पंचासमक्ष मागणी करून तडजोडीअंती रु. 5,000/- घेण्याचे मान्य केल्या प्रकरणी गंगाकिशन विठ्ठलराव ऐनलोड,वय 44 वर्षे, व्यवसाय नौकरी ग्रामसेवक, (वर्ग-3) ग्रामपंचायत कार्यालय रिठ्ठा, ता. भोकर जि. नांदेड रा. बालाजी अपार्टमेंट, फरांदे पार्क, वाडी बु. नांदेड. यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे दिनांक 22 2 2023 रोजी तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड एसीबी च्या पथकाने प्रत्यक्षात कार्यवाही करून ताब्यात घेतले
यातील तक्रारदार यांना वारसाहक्काने वडिलोपार्जित घर मिळाले होते. सदर घराची नमुना न. 8 अ ला तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी घराचे कागदपत्रे पूर्ण करून ती फाईल ग्रामपंचायत कार्यालय,रिठ्ठा येथे दाखल केली होती. त्यानुसार तक्रारदार यांना वारसाहक्काने मिळालेले वडिलोपार्जित घराची नोंद नमुना न. 8 अ ला घेण्यासाठी आरोपी लोकसेवक गंगाकिशन ऐनलोड यांनी तक्रारदार यांना रु. 15,000/- लाचेची पंचासमक्ष मागणी करून तडजोडीअंती रु. 5,000/- घेण्याचे मान्य केले आहे.
आज रोजी आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे.
डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी:-श्री राजेंद्र पाटील,
पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड. सापळा/तपास अधिकारी :-श्री. स्वप्नाली धृतराज,पोलीस निरीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.सापळा कारवाई पथक:- पोलीस निरीक्षक श्री राहुल पखाले, मपोहेकॉ मेनका पवार, पोकॉ ईश्वर जाधव,अरशद खान, रितेश कुलथे, यशवंत दाबनवाड, चापोहेकॉ मारोती सोनटक्के, गजानन राऊत, अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड आदीनी सदरील सापळा यशस्वीरित्या राबविला.
———————-
*नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्रमांक 9623999944
राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड
मोबाईल क्रमांक – 7350197197
*कार्यालय दुरध्वनी – 02262-253512*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*