सेवानिवृत्ती निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार
किनवट:दि.३०जून२०२२ सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय,किनवट येथे शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री प्रकाश राठोड सर ३२ वर्षे सेवा करुन नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ,किनवट शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष ॲड श्री सचिनजी राठोड साहेब उपस्थित होते.मा.अध्यक्षांच्या हस्ते श्री राठोड सरांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीताताई राठोड मॅडम, श्रीमती स्वातीताई राठोड मॅडम जि.प.मुलांचे हायस्कूल,किनवट मुख्याध्यापक श्री जाधव सर तसेच सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री सचिन राठोड साहेब यांनी आपल्या मनोगतातुन श्री राठोड सरांना भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्यमय शुभेच्छा दिल्या व भविष्यात कुठल्याही अडचणीच्या वेळी सदैव आपल्या पाठिशी राहीन अशी ग्वाही दिली.श्री प्रकाश राठोड सरांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे अध्यक्ष,शाळेच्या मुख्याध्यापिका,सर्व कर्मचारी वृंदाचे आभार व्यक्त करीत असता त्यांना गहीवरुन आले.कार्यक्रमाप्रसंगी श्री निलेश भिलवडीकर सर यांनी “माझ्या अनुभवातील पी.एम.राठोड सर”नावाची स्वलिखीत कविता सादर केली.
इयत्ता १० वी शालांत प्रमाण पत्र परीक्षा मार्च २०२२ मध्ये शाळेचा
निकाल १०० टक्के लागला असून तालुक्यातून सर्व प्रथम येण्याचा बहुमान कु. धनश्री प्रकाश राठोड ९७.८०%, तसेच तालुक्यातुन सर्व द्वितीय येण्याचा बहुमान कु. तनिष्का संजय चव्हाण ९७.६०% या शाळेच्या विद्यार्थीनींनी पटकावला आहे. कु.प्रियंका राजु बारापात्रे हीने 96.00%गुण मिळवुन शाळेतुन तृतीय क्रमांक मिळवला.
संस्थेचे अध्यक्ष ॲड श्री सचिनजी राठोड साहेब यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री सुनील निकम यांनी तर आभार श्री निलेश भिलवडीकर यांनी मानले.