साठे जयंती महोत्सव च्या अध्यक्षपदी डॉ. सचिन साबळे , उपाध्यक्ष संदीप शिरसाट, सचिव पंडित आव्हाड,कार्याध्यक्ष प्रा. अनिल साबळे यांची निवड.
सिल्लोड.. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच महाराष्ट्र प्रेनीत, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाची कार्यकारणी ची बैठक युवा मंच प्रवक्ते प्रा. अनिल साबळे, यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी रोजी बैठक घेण्यात आली यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध सामाजिक विधायक उपक्रम , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार साठी जन आंदोलन, अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक साठी गोल्ड मोहर मिल ची जागा, आदी विधायक ज्वलंत प्रश्न तसेच संघटनेच्या वतीने शैक्षणिक जणजागरण अभियान राबविण्यात येणार असून शासनाचे कोवीड ची नियमावली अनुसरून वर्ष भर विविध प्रकारच्या सामाजिक विधायक उपक्रम राबविले जाणार आहेत. असे प्रा अनिल साबळे यांनी सांगितले. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
संस्थापक अध्यक्ष: डॉ सचिन साबळे, उपाध्यक्ष संदीप शिरसाट, सचिव पंडित आव्हाड, कार्यअध्यक्ष प्रा अनिल साबळे, सहसचिव विजय आव्हाड. राज्य कार्यकारिणी सदस्य, विशाल मिसाळ, रमेश सोळसे, शिवाजी हिवाळे ,संतोष थोरात, गजानन साबळे,विजय आव्हाड, संजय घोरपडे, बाप्पू आव्हाड, प्रकाश मिसाळ, प्रशांत साबळे,गजानन आव्हाड, कैलास घोरपडे, सचिन आव्हाड, विश्वजीत साबळे, विकास कांबळे, भागवत भिसे, जॉकी कांबळे, करण कांबळे, सुनील शिरसाठ, प्रकाश कांबळे, राजू मिसाळ, ओमकार आव्हाड, शुभम आव्हाड, विशाल जाधव, अनिकेत आव्हाड आदी