पैनगंगा अभयारण्यातील खरबी सफारी प्रवेशद्वार येथून उद्यापासून पर्यटन सुरू
किनवट/(आनंद भालेराव):
पैनगंगा वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील खराबी वनपरिक्षेत्रात खराबी सफारी गेट येथून दिनांक 6 मे 2022 पासुन निसर्गप्रेमींच्या मागणीवरून निसर्ग पर्यटन सुरू करण्यात येत आहे. पैनगंगा वन्यजीव अभयारण्याच्या परिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, लांडगा, सांबर ,चौसिंगा, काळवीट, इत्यादी सोबतच विविध पशुपक्षी इत्यादी चा मोठ्या प्रमाणात वावर असून जंगलात जैवविविधतेने समृद्ध असल्याने पर्यटकाच्या मागणीनुसार क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जयोती बॅनर्जी मॅडम तसेच विभागीय वन अधिकारी वन्यजीव पांढरकवडा किरण जगताप व सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव पैनगंगा अभयारण्य उमरखेड रवींद्र कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 मे 2022 पासून खरबी सफारी गेट पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून त्याचे बुकिंग क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नियंत्रणाखाली ऑनलाइन पद्धतीने www.magiclmelghat.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आले आहे.
सदर प्रवेशद्वारावरून दररोज सकाळी 5.30 ते 9.30 सात वाहने व दुपारी 3 ते 6.30 या वेळेत सात वाहने दररोज सफारी करिता सोडण्यात येतील तसेच गर्दीच्या एप्रिल मे व जून या कालावधीत 2 ऑफलाईन वाहने असे एकूण 16 वाहने सोडण्यात येतील वैनगंगा वन्यजीव अभयारण्य मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असून लागूनच तेलंगणा या राज्याची सीमा असल्याने सदर प्रवेशद्वार किनवट, नांदेड, यवतमाळ,औरंगाबाद, नागपूर,आदिलाबाद व हैदराबाद येथील पर्यटकांसाठी नांदी ठरणार आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव खरबी यांनी कळविले आहे.