हरियाणा पोलीसांनी पकडलेले विस्फोटक नांदेडसाठी की आदिलाबादसाठी ? नांदेड हायअर्लटवर;रिंदाच्या शेतात तपासणी
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:हरियाणा पोलीसांनी पकडलेले विस्फोटक तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे पोहचविण्यासाठी होते अशी एक नवीन बाब आता समोर आली आहे.या संदर्भाने विस्फोटक प्रकरणांचा संदर्भ रिंदा या व्यक्तीशी असल्याने नांदेड पोलीसांनी आज रिंदाच्या शेतावर बरीच तपासणी केली.सध्या तरी तेथे कांही सापडले नाही. पण रिंदाचे नाव आल्यामुळे नांदेड मात्र सध्या हायअर्लटवर आहे.
काल दि.5 मे रोजी करनाल जिल्हा पोलीसांनी एका चार चाकी गाडीमध्ये विस्फोटक पदार्थ, एक पिस्तुल, जवळपास 30 पेक्षा जास्त जीवंत काडतुसे पकडली. प्रसार माध्यमांनी या घटनेला मोठे महत्व देवून प्रसारीत केले.पकडलेल्या चार जणांनी ते विस्फोटक नांदेडमध्ये घेवून जायचे होते असे सांगितले होते आणि नांदेड जिल्हा हायअर्लटवर आला.त्यांच्याकडे असलेले विस्फोटक त्यांना हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याने ड्रोनच्या सहाय्याने पाठवले होते अशी माहिती त्यांनी दिली.
विस्फोटक नांदेडकडे न्यायचे होते म्हणून नांदेड जिल्हा हायअलर्टवर आला. नांदेड जिल्ह्यात रिंदा या नावाची दहशत आहे.रिंदाने पाठवलेले स्फोटक हरियाणा पोलीसांनी पाठवले असले तरी नांदेड जिल्हा पोलीस घेतलेली दक्षता सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची आहे.
आज जवळपास 24 तासानंतर आणखी एक नवीन बाब समोर आली हरियाणा पोलीसांनी पकडलेले विस्फोटक हे आदिलाबाद,तेलंगाणा राज्यात न्यायचे होते.त्यामुळे थोडासा दिलासाही मिळाला.परंतू ही एक फसवी बाब असू शकते.कारण रिंदा या व्यक्तीचे संबंध आदिलाबादकडे काही आहेत याचा ईतिहासात कांही पुरावा उपलब्ध नाही. दिघोरेसारख्या कांही अधिकाऱ्यांनी तो कालच आदीलाबादकडे गेला, परवाच तो आदिलाबादकडून नांदेडकडे आला होता,कोणत्या मार्गाने गेला, कोणत्या मार्गाने आला अशा आवया त्यावेळी सोडल्या होत्या. रिंदाने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याने स्वत: मी सध्या बबर खालसा या संघटनेचा सदस्य झालो असल्याचे सांगितले होते. तसेच दिघोरे बद्दल बोलतांना त्याने कांही न बोलता बरेच कांही बोलले होते.
सध्या नांदेड जिल्हा हायअर्लटवर असल्याने तपासणी मोहिम सुरू आहे. आज अनेक लोकांच्या घरझडत्या घेण्यात आल्या. पण सध्या कोठेच कांही आक्षेपार्ह सापडले नाही.
विस्फोटक शोधणारा श्वान शिबा याला सोबत घेवून श्वान पथकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याच्या शेतातील तपासणी केली.तेथेही कांही आक्षेपार्ह सापडले नाही.
नांदेड जिल्ह्यातील जनतेने आता नक्कीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.आपल्या आसपास नेहमीच शंकेने पाहण्याची गरज आहे. कारण विस्फोटक आदीलाबादला आले तरी नांदेड कांही दुर नाही.रिंदा या व्यक्तीचा संबंध नांदेडशीच जोडलेला आहे.
त्यामुळे नांदेडकरांनी आपली आणि आपल्या आसपासच्या लोकांसह समाजाच्या सुरक्षेची चिंता करणे अत्यंत आवश्यक आहे.कारण पोलीस कांही देव नाही किंवा जादुगार नाहीत. ज्यांना बसल्याजागी सर्व कांही कळेल.जनतेने सुध्दा आपल्याच सुरक्षेसाठी म्हणून तरी पोलीसांसोबत सहकार्याची भुमिका ठेवणे गरजेचे आहे. तरच विस्फोटकाची जी भिती आज नांदेडकरांना जाणवत आहे.
आम्हीच स्वत:पोलीस आहोत असा विचार करून नांदेडकरांनी जगण्याची वाट धरली तर नक्कीच आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात कांहीच दुर्देवी घटना घडणार नाही असेच या निमित्ताने सांगायचे आहे.