धर्माबाद पोलीसांनी मोटार सायकल चोरास केले जेरबंद
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.26.जिल्यातील धर्माबाद पोलीस स्टेशन अंतर्गत दि.१८/०३/२०२३ रोजी ईनानी मिरची दुकान जवळुन शंकरगज धर्माबाद येथे सकाळी १०.०० वा फिर्यादी शेख खैसर बाबू यांनी त्यांची मोटार सायकल क्रं.एमएच २६बीए २०५८ ही ठेवुन बिलोली येथे असता त्यांची मोटार सायकल अज्ञात आरोपीने चोरुन नेली होती.
फिर्यादी शेख खैसर बाबू आजु बाजुच्या परिसरात मोटार सायकलचा शोध घेतला असता मोटार सायकल मिळुन न आल्यामुळे त्यांनी दि.२१/०३/२०२३ रोजी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे तक्रार दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
अज्ञात आरोपीविरुध्द पो.स्टे.गु.र.नं.५५ / २०२३ कलम ३७९ भा.द.वि.नुसार
दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक श्री.अभिषेक शिंदे यांनी पोलीस अंमलदार पोना / २५७४ :
खदीर यांना घटनास्थळाच्या आजुबाजुच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन
आरोपीची ओळख पटविणे बाबत आदेशीत केले असता अज्ञात आरोपी व्यंकटी राठोड रा. हिपनाळी तांडा मंडळ तानुर जि.निर्मल राज्य तेलगांना येथील असल्याची माहिती प्राप्त झाली.पोलिसांना माहिती मिळताच सदर आरोपीस ताब्यात घेवून अटक करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री.विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक
श्री.अभिषेक शिंदे,सपोउपनि सय्यद आबेद,पोह/१२६ बालाजी नागमवार
पोना/२१७७ सुभाष मुंगल, पोना /२५६३ संतोष अनेराय, पोकॉ/३०९२ विठ्ठल सुपारे चापोकॉ/२७८४ असे सर्वजण मौजे हिपनाळी तांडा येथे जावुन आरोपी व्यंकट गुलाब राठोड यास ताब्यात घेवुन जेरबंद केले.
सदर आरोपीने चोरीस नेलेली मोटरसायकल स.पो.उप.नि उमरेश कारामुंगे यांनी जप्त केली असुन आरोपीस धर्माबाद प्रथम मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीस एमसीआर केले आहे.