किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

भयमुक्त वातावरणात लोकसभा निवडणूक लढा ! निवडणूक निरीक्षकांचे उमेदवारांना आवाहन प्रथम लेखे तपासणी १२ एप्रिल रोजी

नांदेड दि. ८ एप्रिल : लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणतीही अडचण असेल, दबाव असेल, किंवा भीती असेल, काही मदत हवी असेल तर जिल्हा प्रशासनासोबत चार निरीक्षक आपल्या सोबतीला आहे. 24 तास आम्ही इथे कार्यरत आहे. आमच्या सगळ्यांचे दूरध्वनी आपल्याकडे आहेत. कधीही मदत मागा, आदर्श आचारसंहितेच्या पालन करा,असे आवाहन निवडणूक रिंगणात उरलेल्या उमेदवारांना पक्ष निरीक्षक व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी 16 -नांदेड मतदार संघातून 43 उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता 23 उमेदवार रिंगणात आहेत. या 23 रिंगणात असणाऱ्या उमेदवारांसोबत व त्यांच्या प्रतिनिधी सोबत सर्वसामान्य निरीक्षक शशांक मिश्र, खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, खर्च कक्षाचे प्रमुख तथा महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने यांच्यासह खर्चविषयक समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी खर्चाच्या नोंदी कशा ठेवाव्यात कोणत्या खर्चाच्या नोंदी ठेवाव्यात , दैनंदिनी कशी बनवावी यासह खर्चाच्या अनेक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीच्या तपासणीसाठी कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट बैठक कक्ष, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रथम तपासणी 12 एप्रिल सकाळी 11 ते सहा वाजता, द्वितीय तपासणी 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 6 तर तृतीय तपासणी 22 एप्रिल ला सोमवारी 11 ते 6 या कालावधीत होणार आहे. या बैठकींना तपासणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकींना उपस्थित न राहिल्यास, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी अपात्र ठरतो, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी सर्वसाधारण निरीक्षक व अन्य निरीक्षकांनी उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या कुठल्याही अडचणीला सोडवण्यात येईल,असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
०००००

92 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.