प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष, साप्ताहिक मास लिडर सह संपादक, सत्य पोलिस टाइम्स जिल्हा प्रतिनिधी, मी नागरिक फाऊंडेशन कराड या संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश पवार यांना मुंबई येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या ६७ व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित करण्यात आला होता.
जयप्रकाश पवार हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला समर्पित राहून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, कार्यात त्याग व सेवा भावनेनी निरंतर कार्यरत राहून मोलाचे कार्य करून समता, स्वातंत्र्य व बंधुता ही भारतीय संविधानाची मुलभूत तत्वे व राष्ट्रीय एकात्मता जपत असून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर,राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख,महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे,राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,युवा राज्याध्यक्ष डॉ.नितीन शिंदे,युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, संघटक बापू गायकर, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कोकण युवाध्यक्ष सागर पवार, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड.रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड.परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आमले, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.