किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कोरोना काळातील समाजसेवक देवदूत बालासाहेब शिंदे

जळकोट: कोविड महामारीच्या अटीतटीच्या काळात बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी आपण आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करत सामाजिक दायित्व प्राणपणाने जपले आहे.
बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी अतनूर तालुका जळकोट गावासह उदगीर शहरातील व तालुक्यातील गावात कोविड महामारीच्या कोरोना काळ असो वा इतर सर्वसामान्य कुटुंबाच्या व असंघटित कामगारांच्या सेवेसाठी सदैव समाजसेवक देवदूत बनून असत. कोरोना काळात लोकांची करत असलेली मदत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बालासाहेब शिंदे हे उदगीर शहरातील व तालुक्यातील गाव, वाडी, तांडा, वस्ती सह प्रभाग, वार्डात व अतनूर गावात जाऊन असंघटित कामगार, सर्वसामान्य गोरगरीब नागरिक, महिला, पुरुष, लहान बालक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी जनतेला कोविड महामारीच्या काळात कधी धान्य रुपात, कधी जीवनावश्यक वस्तू रूपांनी, कधी स्वस्त धान्य दुकानदार मार्फत तसेच स्वतःच्या स्वखर्चाने जीवनावश्यक वस्तूंसह सॅनिटायझर, मास्क, यांच्यासह वस्तुरूपानी सर्वसामान्य गोरगरिबांना वेळोवेळी विविध सामाजिक व समाजसेवी संस्थेच्या माध्यमाने मदत केली. तसेच ३३ गावे, ५ उपकेंद्र असलेल्या ३५ हजार लोकसंख्या करिता सुसज्ज उपलब्ध असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर तालुका जळकोट चे देवदूत वैद्यकीय अधिकारी डॉ. हरेश्वर सुळे यांच्या नेतृत्वाखाली मानवीसमाजसेवक आरोग्य सेवकदूत म्हणून बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी अनेक कोरोना बाधित रुग्णांना चकक आरोग्य देवदूत डॉ. हरेश्वर सुळे यांच्या मदतीने मृत्यूच्या दाढेतून उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय उदगीर, लातूर, हैदराबाद, जळकोट, पुणे, मुंबई येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात अतनूर प्राथमिक आरोग्य विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने यांनी गेल्या दीड वर्षांपासून अविरत सेवा देवून कोरोना बाधित रुग्णांना जीवदान देण्याचे कार्य करीत आहेत. केलेली आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या महासंकटात रुग्णावर लाखो रुपये खर्च करूनही बाधित रुग्ण वाचण्याची शक्यता कमी, औषधांचा तुटवडा, ऑक्सीजन सिलेंडरची पळवा पळवी, प्रत्येक रुग्णालय बाधित रुग्णांनी खचाखच भरलेले, बाधीतांचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांची धडपड, लाखोने पैसे उपचार घेण्यासाठी पैसे दिले तरी उपचार घेण्यासाठी हॉस्पिटल उपलब्ध नव्हते, अशा या जीवघेण्या काळात जळकोट तालुक्यातील अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरेश्वर सुळे, मानसेवी समाजसेवक तथा आरोग्य मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांच्यासह शासकीय आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून हजारो कोरोना बाधितांना जीवदान देण्यात यशस्वी झालेले. बहुतांश बाधितांना शासकीय मोफत उपचार करून नवजीवन दिले. अति गंभीर स्थितीत कोरोना रुग्णांना रेमडिसिवीर इंजेक्शन करिता धावपळ, न मिळणे, भयभीत होत नातेवाईकांची पायपीट, पळापळ याकरिता बालासाहेब शिंदे भ्रमणध्वनी द्वारे उपलब्ध साठा माहिती मिळवित उपलब्ध करून दिले. त्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासारखे कार्य व काम केले. बी.जी. शिंदे यांची कर्मभूमी अतनूरच. अतनूरच्या मातीशी यांची नाळ जोडल्याने या मातीचे ऋण कोरोना बाधितांना अन्नदान, जीवनावश्यक वस्तू रूपाने, मास्क, सॅनिटायझर, धान्ये रूपात, समाजसेवक तथा आरोग्य सेवक बनून ऋण फेडले. कोविड सेंटर असो किंवा शासकीय रुग्णालय, खाजगी हॉस्पिटल येथे विविध स्वयंसेवी संस्था, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा उदगीर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगारांच्या वतीने बालासाहेब शिंदे सतत कार्यरत असतात. स्वयंसेवी संस्थांमध्ये लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर / अतनूर, साधुराम ग्रामीण विकास बहुद्देशिया सेवाभावी संस्था अतनूर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ उदगीर, शिवाजी कदम स्वस्त धान्य दुकानदार अतनूर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा उदगीर, महाराष्ट्र प्रदेश संघटित कामगार, विविध राजकीय, सामाजिक संघटना, प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर, शासकीय आरोग्य यंत्रणा विविध प्रकारे मदतीचा हात देवून माणुसकीचे दर्शन घडविल्याने कोरोनाच्या महासंकटातून उदगीर, जळकोट तालुक्यातील नागरिकांना कोरोना मुक्त करण्यात यश आले. बालासाहेब गोविंदराव शिंदे या त्यांच्या कामामुळे विविध शासकीय यंत्रणा, कार्यालय, अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांच्या या कामाबद्दल प्रमाणपत्र, ट्रॉफी, शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सत्कार करण्यात आले आहेत. विविध ऑनलाइन समाजसेवी, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शासकीय, निमशासकीय विविध इन्स्टिट्यूटच्या वतीने कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अशा या त्यांच्या कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच शासकीय कार्यालयातही या कार्याची दखल घ्यावी, अशी मागणीही अतनूर ग्रामस्थांनी केली आहे.

518 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.