किनवट येथे भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने भव्य मोर्चा संपन्न; केके गार्डन येथे दोन दिवसीय 5वे महाराष्ट्र राज्यव्यापी अधिवेशन सुरु
किनवट ता.प्रतिनिधी: दिनांक 7 आक्टोंबर 2023 रोजी भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मोर्चा हुतात्मा गोंडराजे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनेक मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. उपविभागीय कार्यालयापासून केके गार्डन गोकुंदा येथे मोर्चा नेण्यात आला. सदरील मोर्चाचे सभेत रूपांतर सभेत झाले. या ठिकाणी सविस्तर उपस्थित मोर्चेकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आदिवासी शेतकऱ्यांच्या आणि समाजाच्या दिव्यांग बांधव व दलित समूहाच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले सहाय्यक जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
यात महाराष्ट्रातील अनियमित पडणारा पाऊस यामुळे ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्या, महाराष्ट्रातील आदिवासी समूहाच्या जमिनी, गैरआदिवासींनी बेकायदेशीर खरेदीखत करून हडप केल्या . हे खरेदी खत बेकायदेशीर असून खरेदी खताच्या आधारे झालेले फेर तात्काळ रद्द करा, सदर प्रकरणी न्यायप्रविष्ट प्रकरण, न्याय नाकारण्याची बेकायदेशीर प्रकरण, दप्तर दिरंगाई करून अन्याय करत आहेत. प्रशासनाच्या वतीने जमिनीचा ताबा देऊन आदिवासी चा फेरफार नोंद करावा व सातबारावर आदिवासी समाजाची नोंद करावी.
गायरान वन जमीन, मसुरा जमीन ,सरकारी जमीन, व कार्पोरेशन जमीन व सामाजिक वनीकरणाची जमीन, देवस्थान जमीन , शेतकऱ्यांच्या नावे तात्काळ पट्टा करा .
आदिवासी अधिसूची पाच-सहाची तात्काळ कठोर अंमलबजावणी करा.
पी इ एस ए कायद्याचा अंमल करा. 50 टक्के पेक्षा जास्त आदिवासी राहत असलेल्या गावाचा केसांमध्ये समावेश करा.
शबरी घरकुल योजनेचे उद्दिष्ट वाढवून प्रत्येक गावात दरवर्षी 150 पेक्षा जास्त घरकुल लाभार्थ्यांना लाभ द्या.
पेसा अंतर्गत नोकर भरती करा व प्रलंबित नियुक्त्या द्या.
शेती वाहिनी फॉरेस्ट कंजर्वेशन ऍक्ट रद्द करा. जंगलाचे खाजगीकरण करणे बंद करा . बांबू ,तेंदूपत्ता इत्यादी वनसंपत्तीचे संगोपन करावा.
व स्थानिक आदिवासी प्रकल्प संचालकाच्या नियंत्रणात सरकारमार्फत उत्खनन करावे.
या व इतर मागण्यांचे सविस्तर निवेदन उपविभागीय कार्यालय किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्यामार्फत भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली
सदरील निवेदनावर एडवोकेट माधवराव मरस कोल्हे कॉम्रेड एम टी पाटील कॉम्रेड गुलाब पाटील मडावी कॉम्रेड पीडी वसमवाड कॉम्रेड अंबादास मडावी कॉम्रेड वसंत पाटील कुडमेथे कॉम्रेड पुंडलिक परचाके कॉम्रेड दत्ता हरी पाटील कॉम्रेड जोतराम तुमराम कॉम्रेड कृष्णा मेश्राम कॉम्रेड चंपतराव पाटील डाखोरे आदींच्या स्वाक्षरी आहेत सदरील मोर्चा दरम्यान किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.
अखिल भारतीय किसान मजदूर सभा पाचवे महाराष्ट्र राज्यव्यापी अधिवेशन दिनांक 7/8 नोव्हेंबर 2023 रोजी शनिवार व रविवारी केके गार्डन किनवट येथे संपन्न होत आहे. यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळ कॉम्रेड पी डी वासमवाड, कॉमेडी एम टी पाटील, कॉम्रेड वसंत पाटील कुडमथे, कॉ. चंपतराव डाखोरे पाटील,तर प्रमुख मार्गदर्शक कॉमेड तानिया, कॉम्रेड चिट्टीपाटी, कॉम्रेड बी भास्कर तर प्रमुख व्याख्याते म्हणून कॉम्रेड सदाशिव भुयारे अर्थतज्ञ नांदेड, अशोक घायाळे केंद्रीय महासचिव हे असणार आहेत.