अंगणवाडी मदतनीस पदभरतीत होतंय शासकीय अध्यादेशाची पायमल्ली *काँग्रेस अल्पसंख्याक सेलचा गंभीर आरोप
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.शहरात महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी मदतनीस पदभरतीची प्रकिया सुरू असून त्यात 2 फेब्रुवारी 2023 च्या शासकीय अध्यादेशाची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अल्पसंख्याक सेलने केला आहे.
सद्या नांदेड शहरात महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी मदतनीस पदभरतीची प्रक्रिया सुरू असून त्यात 2 फेब्रुवारी 2023 च्या शासकीय अध्यादेशाची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या अद्यादेशानुसार उर्दू भाषिक वस्त्यांमध्ये उर्दू भाषेची माहिती (लिहिणे-वाचणे) असणाऱ्या उमेदरांचीच भरती केली जावी असे निर्देश आहेत.
पण नांदेड शहरातील हिलालनगर 1 व 2, बिलालनगर,हमिदिया काॕलनी 1, महबुबिया काॕलनी, खुसरोनगर 3, हैदरबाग,नई आबादी 3,4, 5, 6, पीरबु-हाणनगर 5,हमालपुरा, फारुखनगर,ताजनगर,गाडीपुरा, किल्लारोड,गनिमपुरा 1 व 2, पीरनगर,लेबर काॕलनी, श्रावस्तीनगर,मस्तानपुरा, देगावचाळ,बडी़ दर्गा,ब्रम्हपुरी, रामरहीमनगर,ईतवारा, मक्काबेस,हातजोडी या वस्त्यांमध्ये नियम डावलून ही पदभरती प्रक्रिया होत असल्याचा गंभीर आरोप नांदेडच्या अल्पसंख्याक सेलने केला असून याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे .
यावेळेस आरेफ खान प्रदेश सरचिटणीस काँग्रेस अल्पसंख्याक विभाग नादेड, डाॅक्टर अब्दूल बाखी प्रदेश चिटणीस काँग्रेस अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र नांदेड,शेख अलिमोद्दीन अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी वसमत,राजकुमार पटाईत अध्यक्ष सेवादल काँग्रेस वसमत,जूबेर सर अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग नादेड इत्यादी उपस्थित होते.