किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

१ लाख ९० हजारांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्यास बिलोली पोलिसांनी ४८ तासांत केले जेरबंद

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.11.जिल्यातील बिलोली पोलीस स्टेशन अंतर्गत सगरोळी येथील एक कुटूंब आपल्या कोरोनाबाधित आजारी रूग्णाला घेऊन लातूर येथे उपचारासाठी गेले असताना चोरट्यांनी त्यांचे घर फोडले होते. बिलोली पोलिसांनी दोन दिवसांत चोरट्याला अटक करून चोरीला गेलेला संपुर्ण ऐवज जप्त केला आहे.बिलोली न्यायालयाने या चोरट्याला १२ मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.७ मे रोजी अभय शेषराव वकील रा. सगरोळी यांनी बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, दि.१३ एप्रिल ते ७ मे या दरम्यान त्यांचे मामा पद्माकर शंकरराव देशपांडे हे त्यांच्या सर्व कुटूंबासह कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी लातूर येथे गेले होते.या दरम्यान त्यांच्या घराची मागील दाराची जाळी फाडून चोरट्यांनी आतून कडी काढली आणि घरात प्रवेश मिळवला.

घरातील कपाटचे दार उघडून त्यातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या,दीड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ७.५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंग आणि आठ तोळे वजनाचे चांदीचे चैन,चांदीचे नऊ तोळे वजनाचे करंडे असा एकूण १ लाख ८६ हजार ३५० रूपयांचा ऐवज आणि ४ हजार रूपये रोख रक्कम असा १ लाख ९० हजार ३५० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. पोलीस ठाणे बिलोली दाखल झालेल्या गुन्हा क्र. ८८/२०२१ चा तपास बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगल्ले, जनार्धन गोदणे, पोलीस अंमलदार बालाजी कौठकर आणि साईनाथ बादेवाड यांनी पूर्ण केला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी शारदानगर सगरोळी ता.बिलोली येथील योगेश निळकंठ शिंदे (२४) याला ताब्यात घेतले आणि पोलिसांनी आपल्या सर्व कसबांना वापरत योगेश शिंदेकडून चोरून नेलेला सर्व ऐवज जप्त केला आहे. बिलोली न्यायालयाने या प्रकरणी योगेश निळकंठ शिंदेला १२ जून २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

४८ तासांत चोरट्याला पकडून त्याच्याकडून १०० टक्के ऐवज जप्त करणार्‍या बिलोली पोलिसांचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,बिलोलीचे पोलीस उपअधीक्षक डॉ.सिद्धेश्‍वर धुमाळ यांनी कौतुक केले आहे

139 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.