किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत सीटूने केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

नांदेड :अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या विविध संघटनांच्या कृती समितीच्या वतीने दि.२३ ते २६ नोव्हेंबर देशव्यापी आंदोलन देशभर सुरु आहे.
शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आंदोलनास देशभरातून मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत आहे.
दि.२४ नोव्हेंबर रोजी सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेने अन्नदाता शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात ही प्रमुख मागणी घेऊन पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक ते दोन या वेळेत तीव्र निदर्शने केली.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम आणि अतिवृष्टी काळातील नुकसान भरपाई द्या. ह्या व इतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जिल्हा परिषद नांदेड येथे शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्या घेऊन अनेक आंदोलने केली आहेत परंतु जिल्हा परिषदे कडून प्रतिसाद मिळत नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा परिषदेस पत्र काढून मागण्या सोडविण्याच्या सूचना द्याव्यात असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शालेय पोषण कामगारांचे थकीत मानधन व इंधन बिल तात्काळ काढण्यात यावे. सेंट्रल किचन पद्धती रद्द करावी.विध्यार्थ्यांना सकस आणि ताजा पोषण आहार पुरवठा करावा.शाळा परिसर साफसफाई करण्यास सांगणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करावी आदी मागण्यासह इतरही मागण्या यावेळी करण्यात आल्या.
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉ.विजय गाभणे,सरसिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड,सीटू जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार,कॉ.अनिल कराळे, कॉ.दत्ता शिंदे, कॉ.शिवाजी डुबुकवाड,कॉ.साधना शिंदे,अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड,तालुका अध्यक्ष कॉ.लता गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे, कॉ. नागनाथ पवार, कॉ. कांताबाई तारू,मारोती पाटील, निर्मला शिंदे,सयाबाई राक्षसमारे, भीमराव भालेराव, ईश्वर कपाटे, बाळू अनंतवार, सोनुबाई काकडे, भारत कांबळे आदींच्या स्वक्षऱ्या आहेत.
या निदर्शने आंदोलनात कॉ. विजय गाभणे, कॉ.गंगाधर गायकवाड आणि कॉ. उज्वला पडलवार यांनी मनोगत व्यक्त केले.

82 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.