किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी 19 जून रोजी शिष्यवृत्ती योजना परीक्षा

नांदेड (जिमाका) दि. 18 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन 2021-22 ही घेतली जात आहे. ही परीक्षा रविवार 19 जून 2022 रोजी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पुढील परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.

रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 3 यावेळेत दोन सत्रात जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणीकृत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच परीक्षेसंबधी काही अडचण आल्यास जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीपकुमार बनसोडे आणि विज्ञान पर्यवेक्षक बाजगीरे माधव यांच्याशी 7745851643, 9011000970, 9421293747 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

आयोजित करण्यात आलेली परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. नुतन जि.प.प्रा.शाळा भोकर, जनता हायस्‍कूल नायगाव, महात्‍मा ज्‍योतिबा फुले उमवि गोकुंदा किनवट, श्री शिवाजी हायस्‍कूल कंधार, केंब्रिज माध्‍यमिक विद्यालय शिवाजीनगर नांदेड, मानव्‍य विकास उमवि देगलूर, गुजराती हायस्‍कूल वजिराबाद नांदेड, पंचशील विद्यार्जन विद्यालय हदगाव, श्री संत गाडगेबाबा महाराज उमवि लोहा, नुतन हायस्‍कूल, उमरी, मिनाक्षी देशमुख हायस्‍कूल अर्धापुर, महात्‍मा गांधी उमवि मुदखेड, लिटल फॅ्लावर कॉव्‍हेन्‍ट स्‍कूल बिलोली ही परीक्षा केंद्र आहेत.
000000

78 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.