शेतातील वीज जोडणी सुरळीत करा अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल -अजय कदम पाटील
किनवट टुडे न्यूज नेटवर्क।।
जगभरात कोरोना संक्रमनाने आधीच आर्थिक संकटात शेतकरी अडकला त्यातच अस्मानी संकटाने अवेळी आलेल्या पावसाने शेतकरी यांचे कंबरडे मोडले बी बियाणे घेण्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे .
रब्बी हंगामात हरभरा ,गहू या पिकांची लागवड केली असून बीज अंकुर फुटण्याच्या अवस्थेत आहे. या पिकांना जलस्त्रोता द्वारे पाणी देणे चालू असून अचानक पूर्वसूचना न देता विजतोडणी केली जात आहे.
शेतकऱ्यांची वीज पंपाची वीज तोडणी केल्यास लोकशाही मार्गाने महावितरण समोर आंदोलन करू असा इशारा अजय कदम पाटील तालुका अध्यक्ष मसेस संभाजी ब्रिगेड यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला असून तहसीलदार मार्फत सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना देण्याचे निवेदनात उल्लेख आहे.
शेतकऱ्यांचा महावितरणने सहानुभूति पूर्वक विचार करावा व वीज जोडणी सुरळीत चालू करून सहकार्य करावे असे स्पष्ट निवेदनात असून यावर सुनील चव्हाण पाटील , शिवा पाटील सोळंके,सम्यक सर्पे ,धनंजय कराळे, परमेश्वर घाडगे ,पप्पू पुटवाड यांच्या स्वाक्षर्या आहेत.