खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने जलधारा ३३ केव्ही उपकेंद्राला ५ मेगावॅटचे रोहित्र मिळाल्याने शेतीसह ९ गावांचा विज पुरवठा पुर्ववत
किनवट टुडे न्यूज नेटवर्क:
किनवट तालुक्यातील जलधारा सर्कल मधील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ मेगावॅटचे रोहित्र जळाल्याने ९ गावांचा विज पुरवठा मागील एक महिण्यापासून खंडित झाला होता, खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून एका दिवसात हा प्रश्न निकाली काढून शेतीसह ९ गावांचा विजेचा प्रश्न मिटला असुन खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले जात आहेत.
खरिपानंतर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरवात केली, गहू , हरभरा पीक घेण्याची लगबग सुरू आहे, शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा जलधारा सर्कल मधिल सावरगाव, सावरगावतांडा, मांजरीमाथा,वाघदरी,रिठा, रिठातांडा, नंदगाव, नंदगावतांडा, या गावांचा विज पुरवठा जलधारा ३३ के.व्ही. उपकेंद्रातील ५ मेगावॅटचा क्षमतेचा शेती पंपाचा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे मागील एक महिन्यापासून खंडित झाला होता.
त्यामुळे या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारू करताच तात्काळ खासदार पाटिल यांनी त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी वरीष्ठ पातळी वरून महावितरणची सर्व यंत्रणा कामाला लावली.
खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः नांदेड जिल्हा महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून ९ गावातील शेतीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या यावर महावितरण विभागाने तातडीने कारवाई करून ५ मेगावॅट क्षमतेचे पॉवर टान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतीसह गावांचा विदुयत पुरवठा सुरळीत झाला आहे.
एैरवी सरकारी काम आणि महिनाभर थांब अशी परिस्थिती असतांना सर्व सामान्य माणसाला दप्तर दिरंगाई अधिकार्डयांच्या हेळसांड पणाचा सामना करावा लागतो परंतु लोकप्रतिनिधींनी दखल घेताच सर्व यंत्रणा गतिमान झाल्याचा प्रत्यय आला , यामुळे जलधारा सर्कल मधील ९ गावातील एैन खरीपाच्या हंगामात शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागून विज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कार्याचे, त्यांच्या यंत्रणेचे कौतुक करून आभार मानले आहेत. शेती व शेतकरी यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असलेले खासदार हेमंत पाटील प्रामुख्याने शेती – शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्य देऊन सोडवत असतात .