कोळी राष्ट्रसंघ जिल्हाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारोह हिमायतनगर येथे संपन्न
*नांदेड जिल्हा प्रतिनीधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.18.जिल्ह्यातील कोळी राष्ट्रसंघ परिवार च्या वतीने नवनिर्वाचित पदाधीकारी यांचा शाल श्रीफल देवून सत्कार करण्यात आला आहे.
डॉ.अमोल सेंबेटवाड पुढे म्हणाले की,शिका व संघटीत व्हा सर्व संघटना बाजुला ठेवुन समाजासाठी चांगल कार्य करा,आपण जोपर्यंत एकजूट होणार नाहीत तोपर्यंत आपला जात प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र विषय मिटणार नाही गेली अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहेत हा मार्ग मोकळा करणे असेल तर आपसातील मतभेद विसरून एकत्र येऊन काम करीत राहील पाहीजे तरच समाजातील प्रश्न मार्गी लागतील अपेक्षित आहे.
कोळी राष्ट्रसंघ नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जंगेवाड भाऊ यांनी समाज बांधवांना तुम्ही सर्व जिल्ह्य़ातील समाज बांधव मला समाजासाठी कार्य करण्यासाठी साथ द्या मी तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाला तोंड देण्यास तयार आहे.
मोर्चा आंदोलन,निवेदन ह्या गोष्टी करण्यात सर्व समाज बांधवाच सहकार्य मिळत असेल तर मी तुमच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहून कार्य करेन,केस,जेल भोगायला तयार आहे समाज कार्य हेच माझ ध्येय राहणार आहे.
सदर,आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी मान्यवरांचे भाषणे करून एक समाजाला जागृत करण्यात आल,आणी कोळी राष्ट्रसंघ नांदेड परीवार च्या वतीने शाल श्रीफल देवून सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी,कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा उपाध्यक्ष मा.श्री.उद्धव भाऊ मामडे रावधानोरकर, महिला अध्यक्षा सौ.सारिकाताई जिरोणेकर,डॉ.अमोल सेंबेटवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भाऊ जंगेवाड,रायखोडकर, युवाअध्यक्ष सदाशिव बोईनवाड,नारायण सादलवाड,बालाजी करडेवाड,प्रमोद मनिकवाड,माणिक सादलवाड,ज्ञानेश्वर पिटलेवाड,गजानन सोमेवाड,अंकुश पिल्लेवाड यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
सर्व समाज बांधव नवनिर्वाचित पदाधिकारी, मान्यवरांचे आभार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जंगेवाड भाऊ यांनी मानले आहे.