गोकुंदा येथिल जिल्हा परिषद सदस्या सौ. संगिता प्रविण म्याकलवार यांनी गोकुंदा ग्राम पंचायत चे स्वतंत्र्य नगर पंचायत मध्ये रुपांतर करण्याकरिता शासनाला प्रस्ताव पाठवण्याची केली विनंती
किनवट ता. प्र दि ०५ तालुक्यातील गोकुंदा ग्राम पंचायत हि सर्वात मोठ्या ग्राम पंचायती पैकी एक ग्रामपंचायत आहे किनवट शहराला लागुन असलेली हि ग्रामपंचायत वेगानी विकसीत होत आहे त्यामुळे येथे मोठमोठ्या नागरी वस्त्या निर्माण झाल्या आहे ज्यामुळे त्याठीकाणच्या नागरीक गरजा पुर्ण करण्याकरिता ग्राम पंचायत यंत्रणा कमी पडत आहे. नागरीकांच्या समस्या पाहता त्यांना सोडवण्याकरिता स्वतंत्र्य नगर पंचायत यंत्रणा आवश्यक असल्याने गोकुंदा येथिल जिल्हा परिषद सदस्या सौ. संगिता प्रविण म्याकलवार यांनी गोकुंदा ग्राम पंचायत चे स्वतंत्र्य नगर पंचायत मध्ये रुपांतर करण्याकरिता शासनाला प्रस्ताव पाठवण्याची विनंती एका निवेदनाव्दारे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार यांच्याकडे केली आहे.
गोकुंदा गाव हे वेगाने विकसीत होत असलेले गाव असुन येथे आजच्या स्थितीत असलेली प्रशासकीय यंत्रणा हि कुचकामी ठरत आहे त्यामुळे या शहराच्या रोजच्या गरजा, स्वच्छता, दिवाबत्ती व तत्सम नागरी सुविधा करिता उपलब्ध असलेला निधी हा अत्यल्प होत असुन शहराची वाढलेली लोकसंख्या पाहता येथे स्वतंत्र्य नगर पंचायत अत्यावश्यक झाली आहे. ज्यामुळे शहराच्या देखरेखी करिता वाढीव निधी उपलब्ध होणार आहे तर शहराच्या विविध दाखले, स्वच्छता संदर्भातील रोजच्या कामा करिता जास्तीचे मनुष्यबळ देखिल उपलब्ध होणार आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना गोकुंदाचे माजी उपसरपंच प्रविण म्याकलवार यांनी सांगितले कि, आमच्या कुटुंबावर गोकुंदा शहरातील नागरीकांनी मागील ४० वर्षापासुन विश्वास दाखवला आहे व येथिल जनतेने जो विश्वास दाखवला आहे त्याच विश्वासाला सार्थ जाण्याकरिता येथिल नागरीकांना व मालमत्ता धारकांना कशा प्रकारे उत्तम नागरी सुविधा प्राप्त होतील या करिता भविष्यातील गरज पाहता आजच नियोजन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्याशी चर्चा करुन व त्यांच्या माध्यमातुन शासनस्तरावर गोकुंदा शहरा करिता योग्य ते नियोजन करण्याकरिता लवकरच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या भेटी घेणार आहोत.
तरी गोकुंदा येथे म्याकलवार कुंटुंबाचे पॅनल चे वर्चस्व मागील अनेक वर्षापासुन आहे तर येथिल नागरीकांनी त्यांना सरपंच, उपसरपंच व जिल्हा परिषद सदस्य अशा पदावर निवडुन दिल्याने त्यांच्या कुटुंबियांची नैतिक जबाबदारी गोकुंदा प्रती असल्याने त्या करिता ते प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सौ संगिता प्रविण म्याकलवार यांनी सांगितले आहे.
किनवट तालुक्यातील गोकुंदा हे मोठे शहर असुन येथे प्रचंड नागरीवस्ती आहेत, किनवट शहर व पैनगंगातीरी वसलेल्या या शहरामध्ये किनवट तालुक्यातील महत्वाचे कार्यालय आहेत, मोठमोठी विद्यालय आहे, महाविद्यालय आहे, तर कोचिंग क्लासेस आहेत तर बाहेर गावातील विद्यार्थी हे शिक्षणाकरिता गोकुंदा येथेच वास्तव्यास राहतात त्यामुळे या गावात प्रचंद वर्दळ राहते वरिल सर्व बाबी पाहता व येथिल लोकसंख्या हि अंदाजे १५ ते १६ हजार असुन त्याच अणुपातात मतदान आहे. त्यामुळे येथे नगर पंचायत स्थापन करणे आवश्यक झाले आहे.