केंद्रातील अधिकाऱ्याकडून बदनामीकारक व कमी लेखणारी टिप्पणी; अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचा अपमान; मातंग समाजामध्ये असंतोष
किनवट/प्रतिनिधी:
तात्कालीन भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी 31 जुलै 2021 केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र खटिक सामाजिक न्याय तथा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडे पत्राद्वारे महापुरुषांच्या यादीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव समावेश करण्यासाठी निवेदन सादर केले होते व त्या पत्रात साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती देण्यात आली होती परंतु त्या पत्राचे उत्तर देताना या विभागाचे केंद्रीय स्तरावरील अधिकारी विकास त्रिवेदी यांनी अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व नाहीत अशा प्रकारचे टिपणी केली आहे हे टिपणी या महापुरुषांसाठी बदनामीकारक व कमी लेखणारी असल्यामुळे महापुरुषांचा अपमान झालेला आहे त्याबद्दल मातंग समाजामध्ये या अधिकार याबद्दल असंतोष खदखदत असल्याचे समाज माध्यम मधून दिसून येत आहे आहे. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेली चळवळ व अमाप साहित्यसंपदा हे सातासमुद्रापलीकडे ही माहीत असताना आपल्या देशाच्या आधिकरी अनभिज्ञ कसे?असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक राष्ट्रांमध्ये अण्णाभाऊ साठे ची ओळख असताना व त्यांचे साहित्य जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये रूपांतरित असताना अण्णाभाऊ साठे ना प्रसिद्ध व्यक्ती नसल्याचे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे व केंद्राने मातंग समाजाची माफी मागावी व तात्काळ अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.