गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतूस व एक मोठी धारदार तलवार बेकायदेशीर आढळुन आल्याने तीन आरोपींना अटक
*धर्माबाद पोलिसांची मोठी कार्यवाही*
*पुढे होणारा घातपाताचा डाव पोलिस यंत्रणेने उध्वस्त केला*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.18.जिल्यातील धर्माबाद तालुक्यात गावठी पिस्तुलसह दोन जिवंत काडतूस व एक मोठी धारदार तलवार आढळुन आल्याप्रकरणी धर्माबाद पोलिसांनी तीन आरोपीना दि.१६ नोव्हेंबंर रोजी अटक करण्यात आली असुन धर्माबाद पोलिसांनी मोठ्या शितापतीने तपास लावल्याने पुढे घडणा-या घातपाताचा डाव उधळुन लावल्याने धर्माबाद शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे. या प्रकरणी पिस्तुल आढलून आलेले दोन आरोपी व तलवार आढलून आलेला एक असा तीन आरोपीवर धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्माबाद तालुक्यातील योगेश लोकडोबा गट्टूवार वय २३ (रा.पाटोदा बु.) मारुती शंकर कोंडलवाडे वय २७ (रा. मंगनाळी) या तरुणांच्या घरी गावठी पिस्तुल असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. व अक्षय रावसाहेब वाघमारे वय २०( रा. पाटोदा खुर्द) यांच्याकडे मोठी धारदार तलवार असल्याची गोपनीय माहिती धर्माबाद पोलिसांना मिळाली. यावरून धर्माबाबत नगरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली साहयक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलीस नाईक हरीश मांजरमकर, गोपनीय शाखेचे संतोष आनेराय, पोलीस नाईक, सुभाष मुंगल, संतोष घोसले, सचिन गडपवार, पंडित जोंधळे, व आबेदली यांनी सदरील तीनही तरुणांना पोलीस यंत्रणेचा सापळा रचून त्यांच्या गावात आरोपींना पकडून उपरोक्त शस्त्र विहिरीतून हस्तगत केले.
धर्माबाद पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुसार उपरोक्त कारवाई झाली असून अक्षय रावसाहेब वाघमारे राहणार पाटोदा खुर्द याच्याकडे मोठी धारदार तलवार आढळून आली त्यानुसार गु.र.नं. 284 कलम ४/२५भा. द. वी.प्रमाणे धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. व गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस आढळून आले या प्रकरणी पाटोदा येथील आरोप योगेश लोकडोबा गट्टूवार व मंगनाळी येथील आरोपी मारुती शंकर कोंडलवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हे वृत्त लिहीपर्यंत चालू होती.
उपरोक्त पार्श्वभूमीवर धर्माबाद तालुक्यात काही घातपाताचा प्रकार आहे का ? याचा पोलिस शोध घेत असून तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.