घोगरवाडी अंतर्गत येणाऱ्या शक्ती नगर येथील अनिता गणपत उईके विहीरीतून पाणी काढत असताना अचानक तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू
किनवट/प्रतिनिधी: घोगरवाडी अंतर्गत येणाऱ्या शक्ती नगर येथील अनिता गणपत उईके विहीरीतून पाणी काढत असताना अचानक तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवार दिनांक 11 रोजी सकाळी 9 वाजता घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी 9 वाजता अनिता शेताकडे जात होती. नेहमीप्रमाणे रस्त्यात विहीरीमध्ये पाणी घेण्यासाठी ती उतरली.अचानक तोल गेल्याने ती विहिरीत पडली वा तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल खुरेशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
याप्रसंगी घटनास्थळी अनुरुद्ध केंद्रे, गोवर्धन मुंडे दत्ता आडे आदी उपस्थित होते
539 Views