लोहा येथिल BRS च्या जाहीर सभेस किनवट माहूर तालुक्यातील 5 हजार कार्यकर्ते जाणार
किनवट प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे दिनांक 26 मार्च रोजी रविवारी भव्य जाहीर सभा आयोजित केली असून या सभेला मुख्यमंत्री के.सी.आर मार्गदर्शन करणार आहेत या सभेसाठी किनवट माहुर तालुक्यातील सुमारे पाच हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती बी आर एस चे नेते धनलाल पवार यांनी पत्रकारांना दिली आहे.
तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय पक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री के सी आर चंद्रशेखर राव यांनी सबंध भारत देशात पक्ष बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या दृष्टीने तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या किनवट माहूर तालुक्यातही बी आर एस पक्षाने मजबूत पाय रोवले आहेत मुख्यमंत्री के सी आर यांच्या विकासाभिमुख किनवट माहूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते पक्षात येण्यास इच्छुक आहेत आगामी निवडणुका बी आर एस ताकतीने लढणार आहे. पक्ष संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून दिनांक 26 मार्च 2023 रोजी लोहा येथे भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे या सभेला मुख्यमंत्री के सी आर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या सभेसाठी किनवट माहूर तालुक्यातील जवळपास 5000 कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती धनलाल पवार यांनी दिली आहे यावेळी त्यांनी किनवट जिल्हा निर्मिती संदर्भात भाष्य केले असून मी या सभेत मुख्यमंत्री के सी आर यांना भेटून किनवट जिल्हा निर्मितीचे निवेदन सादर करणार आहे मागील तीस वर्षापासून प्रलंबित असलेला किनवट जिल्हा निर्मितीचा प्रश्न फक्त बी आर एस एस सोडू शकते अशी गावी धनलाल पवार यांनी यावेळी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता किनवट येथेही लवकरच बी आर एस चा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती ही धनलाल पवार यांनी यावेळी दिली त्यांच्या समवेत अकबर खान सेवादास जाधव इंदल पवार कितीराज देठे हे उपस्थित होते