किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

देगलूर शहरात वाढले अवैध व्यवसाय ; अवैध धंद्यांमुळे अनेक कुटूंब उध्वस्त

*मरखेल पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा वाढला हा… हा..कार….*

*तालुक्यातील अवैध त्वरित बंद करा..विशाल पवार*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.22.जिल्ह्यातील देगलूर शहरातील गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाधताना दिसून येत आहे.

त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे़.अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु काही मोकळेच रान मिळाले आहे.

शहरातील विविध भागात सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी “एनओसी” च दिली की काय,असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे.

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला, चहाची टपरी आदी अशा व्यवसायाकडे वळत होते.

मात्र,आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात गुटखा,दारूविक्री,सट्टा,जुगार, मटका अशा प्रकारच्या अवैध धंद्याकडे त्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही,तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे.त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालचेपोटी जिल्हाभरच नव्हे तर देगलूर शहरातही दारूचा (मद्यपान) व्यवसाय गृह उद्योग तर मटका,जुगार,सट्टा उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.

की काय ?तरूणांनी सट्टा,जुगार,मटक्याला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे की काय असा चित्र दिसून येत आहे. घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही, घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़,यावर तरुणांनी उपाय शोधला आहे की काय? असा प्रश्न निर्मात होत आहे.

सट्टा,मटका या वर पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत. सट्टा ,मटका,जुगार आदी यावर तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत.

क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडल्या जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत.

मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत असल्याचे दिसून येत आहे.

या सट्टा ,मटका,जुगार आदी च्या नादी लागुण कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असताना पाहायला मिळत आहे.

शहरात कित्येक मटका,सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय लावलेले आहे.या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.

या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती ” जैसे थे ” असते.देगलूर शहर पोलिस स्टेशन,मरखेल पोलिस स्टेशन या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम मटका,गुटखा , सट्टापट्टीसह इतर अवैध व्यवसाय सुरू आहे.

मात्र असे असतानाही या पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

100 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.