हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची महापौरांनी पुण्यात केली पाहणी…
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचा नियोजित पुतळा शहरामध्ये बसविण्याचा निर्णय पालकमंत्री आशोकाराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाने घेतला.या पुतळा निर्मितीची निविदा जागतिक स्तरावर प्रख्यात शिल्पकार सृष्टी आर्ट झोनला सुटली आहे. पुणे येथील कात्रज भागात ‘क्ले मॉडल’ची महापौरांसह पुतळा कृती समितीने शनिवारी पाहणी केली. किंबहूना आवश्यक त्या बदलाच्या सूचना देखील केल्या आहेत.
नांदेड शहराला सर्वांत सुंदर आणि महानगर बनविण्याचे अनुषंगाने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आणि पुढाकारातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारून येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे.
नांदेड शहरात उभारण्यात येत असलेल्या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भर पडते आहे शिवाय वर्तमानातील आणि भविष्यातील पिढीलाही या पुतळ्यामुळे प्रेरणा मिळते आहे.इतिहासाची उजळणी होते आहे.आता स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात निश्चितपणे भर पडणार आहे.
स्व. वसंतराव नाईक यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय झाला असून शासनाने देखील परवानगी दिली आहे. स्व.वसंतराव नाईक यांचा नियोजित बसविण्यात येणारा पुतळा हा ब्रॉन्झ धातूमध्ये राहणार आहे. गुजरातच्या दृष्टी आर्ट झोन हा पुतळा तयार करणार आहे.या पुतळ्याचे ‘क्ले मॉडल’ पुण्याच्या कात्रज भागामध्ये ९ फुट उंच असणाऱ्या पुतळ्याची पाहणी महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांनी शनिवारी केली आहे.
पुतळा कृती समितीचे तथा जि.प. चे सभापती रामराव नाईक, नगरसेवक श्रीनिवास जाधव, प्रकाश राठोड,रोहिदास जाधव, स्वप्नील चव्हाण, विनोद चव्हाण यांच्यासह महापालिकेचे उद्यान अधिक्षक तथा सहाय्यक आयुक्त डॉ. फरतुल्ला बेग यांनी या पुतळ्याची पाहणी केली. यावेळी अॅड. निलेश पावडे यांची देखील उपस्थिती होती. कृती समितीच्यावतीने पुतळ्यामध्ये आवश्यक बदल असणाऱ्या सूचना देखील दृष्टी आर्ट झोनला केल्या आहेत.