‘युवकांचा ध्यास; ग्राम व शहर विकास’, हे उद्दिष्ट ठेवून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सुरुवात
नांदेड,दि.३ (प्रतिनिधि)
‘युवकांचा ध्यास; ग्राम व शहर विकास’, हे उद्दिष्ट ठेवून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची आज सुरुवात झाली.
येथील श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘युवकांचा ध्यास; ग्राम व शहर विकास’, यासाठी विशेष वार्षिक शिबिर २०२३ चे उद् घाटन संभारभ आज दिनांक ०३.०२.२३ दुपारी १२:०० वा. सामाजिक शास्त्रे संकुल येथे उत्साहात पार पडले. महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्रे संकुलात सुरु झालेल्या या शिबिराचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ . मल्लिकार्जुन करजगी यांच्या हस्ते करण्यात आले.
वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ.व्हि.आर.राठोड,माजी समन्वयक डॉ. नागेश कांबळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या उद् घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार म्हणाले की, या सात दिवशीय शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्व विकास घडवले पाहिजे. या शिबिरात येणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकाच्या विचारांचा मोठा खजिना विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध होणार आहे. त्याची शिदोरी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत जतन करून ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.
रासेयो माजी समन्वयक
डॉ. नागेश कांबळे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळवून देणारे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. ‘नॉट मी बट यू ‘, हे रासेयोचे ब्रीद वाक्य विद्यार्थ्यांनी अंगीकारून समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटकीय भाषणात डॉ. मल्लिकार्जुन करजगी हे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, आज प्रत्येक क्षेत्रात रासेयो आघाडीवर आहे.
आजच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यांनी रासेयोत सहभागी होऊन स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधत समाज हिताला वाहून घेतले पाहिजे. आपलं व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करावं तसेच विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजकार्यात सदैव तत्पर असल पहिजे.आणि आज संगणकीय युगात आपण सर्वांनी आपल्या गावात जाऊन डिजिटल करन्सी, ऑनलाइन बँकिंग, रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती इत्यादी सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. जो कोणी विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात टिकेल तोच विद्यार्थी भविष्यात यशस्वी होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा.
ग्रामस्वच्छता, आरोग्य विषयक जनजागृती, महिला व बालकल्याण विकासासाठी आवश्यक प्रयत्न करावेत असे अध्यक्षीय भाषणात त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. साहेबराव शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यापीठ रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बाबुराव जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमाला डॉ. पंडीत चव्हाण, डॉ. डॉ. एस व्ही शेटे. डॉ. आर एम. कांगणे, डॉ. उत्तम कानवटे, डॉ. विजय मोरे, डॉ. संजय गिरे, डॉ. सुनीता गरूड, डॉ.साहेबराव मोरे, डॉ. नंदकुमार बोधगिरे, डॉ. प्रमोद लोणारकर, स्वामी, डॉ. दत्ता खरात, प्रा. कपिल इंगोले, प्रा.शशिकांत हाटकर, संदीप कळासरे, विशाल गायकवाड यांच्या सह सामाजिक शास्त्रे संकुलातील, व वसंतराव नाईक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.