शासनाचा अपेक्षित कर बुडविल्या प्रकरणी दोषी ठरवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. -भाजपचे जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे पाटील
इस्लापूर :- ( वार्ताहर )
इस्लापूर येथील परवाना धारक देशी दारू विक्रेत्याने बनावट दारू निर्मिती करूण ती मद्यपी स विक्री करूण त्यांच्या आरोग्याशी खेळ चालवीला असून अनेकांच्या आरोग्यावर याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. या भागातील मद्यपी नागरीकांच्या बाधीत आरोग्याच्या समस्येस कारणीभूत ठरत व शासनाचा अपेक्षित कर बुडविल्या प्रकरणी दोषी ठरवून कायदेशीर कारवाई संबंधित बनावट दारू विक्रेत्यावर करावी. अशी मागणी भाजपचे जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे पाटील यांनी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयूक्त मुंबई यांना दिलेल्या निवेदनात भाजपचे जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे पाटील यांनी मह्टले आहे की, दि. 12 डिसेंबर 2021 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नांदेड यांना गुप्त माहीती मिळाल्यावरून इस्लापूर येथे सापळा रचून वाहतूकीचा एक गुन्हा नोंदविण्यात आला असून तपासात मौ. इस्लापूर येथील देशी दारू किरकोळ दुकानात विना परवाना वाहतूक पासचे व तसेच देशी दारूचे बनावट मद्दसाठा मिळून आला म्हणून येथील देशी दारू दुकान – 3 अनूज्ञाप्ती अंतर्गत चे सर्व व्यवहार बंद केले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. व तसेच बनावट म्द्य उत्पादन करूण बनावट बुच ( झाकन किंवा टक्कन ) लावून विक्री व वाहतूक केल्या जात होती. असे निष्पन्न झाले असून सदरील परवाना धारक देशी दारू विक्रेता यांनी या भागातील मद्दे प्रेमी नागरीकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चालू असून या भागातील अनेक म्द्य प्रेमी नागरिकांच्या तब्येतीवर गंभीर विपरित परिणाम जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.व तसेच बनावट म्द्य निर्मिती व विक्री करूण शासनाचा मोठ्याप्रमाणात या दारू विक्रेत्याने महसूल बुडविला असल्याने त्यांच्या मालमत्तेतून सदर महसूलाची वसूली करण्यात यावी. अशी मागणी काशिनाथ शिंदे पाटील यांनी केली असून संबंधितांनी या बाबीची गंभीर नोंद घेवून सदर दोषींवर परवाना रद्द बातलची कारवाई करावी. अशी मागणी ही निवेदनात नमूद केली असून. निवेदनाच्या पर्ती राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी नांदेड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नांदेड, पोलीस ठाणे इस्लापूर यांना दिल्या आहेत.