जवाहर नवोदय चाचणी परीक्षा 2021 च्या संदर्भाने होणाऱ्या परीक्षे संदर्भात पूर्व बैठकीचे आयोजन बळीराम पाटील महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर संपन्न
किनवट.( ता.प्र.)आज दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी जवाहर नवोदय चाचणी परीक्षा 2021 च्या संदर्भाने होणाऱ्या परीक्षे संदर्भात पूर्व बैठकीचे आयोजन बळीराम पाटील महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर घेण्यात आले.
या बैठकीचे अध्यक्ष सी एल ओ रामा उईके प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर, केंद्रसंचालक प्रा.अनिल पाटील आदींची उपस्थिती होती
गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला केंद्र संचालक प्रा. अनिल पाटील यांनी वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचना बैठकीत सांगून परीक्षा या covid-19 च्या नियमाचे पालन करून सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे म्हणाले. तसेच परीक्षा संदर्भातील विविध सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले याप्रसंगी C L O रामा उईके यांनी आपले मनोगत व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला सदरील परीक्षेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड, गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बेंबरेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या बैठकीच्या कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी केले .
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. गजानन वानखेडे ,प्रा विजय खूपसे ,एनसीसी विभाग प्रमुख प्रा काजी ,डॉ कोमावार डॉ.पेंडलवार प्रा.दमकोंडवार पर्यवेक्षक, कर्णेवार सर ,मुलकेवार सर ,जाधव एमडी ,मेटकर, बोंबले सर, जाधव ए टी,शिरसागर सर ,एडके, जाधव आर एस,चोंडेकर ,तारू मॅडम ,केळगीरे मॅडम, महाविद्यालयाचे कर्मचारी मिलिंद लोकडे व सुधीर पाटील यांनी सहकार्य केले