*आदर्श नगरी किनवट तर्फे आमदार भिमरावजी केराम साहेब यांचे जाहीर सत्कार*
किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 25/12/2024 रोजी आमदार भीमरावजी केराम साहेब यांची नुकत्याच झालेल्या 2024 विधानसभा निवडणूक मध्ये विजयी झाल्याबाबत आदर्श नगर किनवट येथील नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी सत्कारमूर्ती आमदार भीमरावजी केराम साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.आनंद मच्छेवार(मा.नगराध्यक्ष), श्री.गोवर्धन मुंडे (केंद्रीय अन्वेषक अनुसूचित जाती जमाती नवी दिल्ली),श्री.स्वागत आयनेनीवार ( जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा नांदेड जिल्हा),नरेश सिरमनवार(मा.नगरसेवक),श्री.राहुल चव्हाण ( अथर्व इंजी.अँड बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर)श्री.दत्ता आडे (पं.स.सभापती) श्री. तुकाराम पेंदोर (सेवानिवृत्त अधिकारी भूमी अभिलेख विभाग),श्री. भगवंतराव सिरमनवार (सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी),श्री.प्रभाकर नेम्मानीवार (सामाजिक कार्यकर्ते)श्री.साई पालेपवाड (तालुकाध्यक्ष युवा सेना),श्री.आश्विन पवार (युवा सामाजिक कार्यकर्ते),श्री.रामलू जगडमवार (से.नि.कर्मचारी राज्य परिवहन महामंडळ)हे उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सर्व कॉलनिवासिय यांच्या हस्ते सत्कारमूर्ती श्री. भीमरावजी केराम साहेब यांचा पुष्पगुच्छ,शाल,आणि भारतीय संविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले.सर्व मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रामकृष्ण केंद्रे तर मनोगत सौ.अश्विनी तामगाडगे,श्री.विजय पेंदोर यांनी तर संचलन श्री.गजेंद्र बोड्डेवार,आभार श्री.संतोष शिरगुरवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.कृष्णा देशपांडे,श्री.जयवंत चामनर,श्री.संतोष गिरी,श्री.अनिल तुमराम,श्री.सुरेश पडलवार,श्री युवराज वाठोरे,श्री.संतोष कोतपेल्लीवार,श्री.सचिन चामनर,श्री.ज्ञानेश्वर केंद्रे,श्री. भीमराव पा.केंद्रे,श्री.संग्राम भरणे,श्री.कैलास कांबळे,श्री.प्रवीण आईटवार,श्री.प्रकाश सुपलवार,श्री.रमेश बंड्रेवार,श्री.राहुल तामगाडगे, श्री.धनराज एन्द्रलवार,भूमन्ना पुरेवार,श्री.संजय गित्ते,श्री.राजू ठोंबरे,प्रवीण नेमानिवार,श्री.मरापे,श्री. चंटी यादव,श्री.जोशी,श्री.हळदकर,श्री.संदुलवार,श्री. कर्णेवार,श्री.चव्हाण आणि श्री.रवी गाढवे यांनी सहकार्य केले.